माय फ्रेंड श्रीगणेशा - प्रश्नावली
--
१) संत तुकाराम महाराज यांचा ‘करा क्षमा अपराध’ हा अभंग कोणाला उद्देशून आहे?
अ) संत नामदेव ब) संत सोपानदेव क) संत ज्ञानेश्वर ड) पांडुरंग
२) यज्ञोपवीत म्हणजे काय?
अ) उपरणे ब) जानवे क) पीतांबर ड) अंगरखा
३) प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला काय म्हणतात?
अ) विनायकी ब) संकष्टी क) गणेश ड) अंगारकी
४) चिंचवडच्या चिंतामणी महाराजांना उद्देशून अभंग कोणाचा आहे?
अ) संत तुकाराम ब) संत ज्ञानेश्वर क) संत एकनाथ ड) संत नामदेव
५) रामायणकर्ते ऋषी कोण?
अ) वाल्मीकी ब) व्यास क) वशिष्ठ ड) कौशल्य
६) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी गणपतीला काय संबोधले आहे?
अ) वेदप्रतिपाद्या ब) गजवदना क) मोरेश्वर ड) मयुरेश्वर
७) गणांचा ईश म्हणून कोणाला ओळखले जाते?
अ) गणपती ब) विनायक क) गणेश ड) मोरया
८) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरू कोण?
अ) संत नामदेव ब) संत निवृत्तीनाथ क) संत एकनाथ ड) संत मुक्ताबाई
९) प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला काय म्हणतात?
अ) अंगारकी ब) संकष्टी क) गणेश ड) विनायकी चतुर्थी
१०) गणपतीचे एक संबोधन कोणते?
अ) सुखहर्ता ब) गणनाथ क) विघ्नदाता ड) दुःखहर्ता
११)
अ) ब) क) ड)
१२) ‘ॐकार’ स्वरूप कोण आहे?
अ) संत ज्ञानेश्वर ब) गणपती क) संत तुकाराम ड) शंकर
१३) मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला काय म्हणतात
अ) अंगारकी ब) विनायकी क) संकष्टी ड) गणेश जयंती
१४) गणपतीचे एक वाहन कोणते?
अ) बदक ब) ऐरावत क) हरिण ड) मूषक
अ) ब) क) ड)
१५)
अ) ब) क) ड)
१६) कीर्तनाच्या निरुपनासाठीचा ‘धरोनियां फरश करी।’ अभंग कोणाचा आहे?
अ) संत ज्ञानेश्वर ब) संत नामदेव क) संत एकनाथ ड) संत तुकाराम
१७) गणेशोत्सव कोणत्या महिन्यात असतो?
अ) श्रावण ब) भाद्रपद क) आश्विन ड) कार्तिक
१८) गणेशोत्सवाचा प्रारंभ कोणत्या तिथीला होतो?
अ) गणेश जयंती ब) गणेश चतुर्दशी क) गणेश चतुर्थी ड) संकष्टी चतुर्थी
१९) गणपतीला प्रिय वस्तुंचे वर्णन कशात आहे?
अ) अथर्वशीर्ष ब) आरती पुस्तिका क) उपासना ग्रंथ ड) पूजाविधी ग्रंथ
२०) गणपतीचे आवडते फूल कोणते?
अ) कन्हेर ब) गुलाब क) झेंडू ड) जास्वंद
२१) संतांच्या अभंगाचे निरूपण करण्याचे माध्यम कोणते?
अ) कीर्तन ब) भजन क) गौळण ड) कार्यशाळा
२२) गणपतीच्या हातात कोणते आयुध असते?
अ) ढाल ब) अंकुश क) तीरकमान ड) भाला
२३) गणपतीला काय प्रिय आहे?
अ) दूर्वा ब) तुळस क) मकई ड) गवत
२४) गणपतीचे एक नाव काय?
अ) हत्ती ब) पीतांबर क) वक्रतुंड ड) वंदन
२५)
अ) ब) क) ड)
२६) गणपतीच्या हातातील शस्रांना काय म्हणतात?
अ) अण्वस्र ब) आयुध क) साधने ड) त्रिशूळ
२७) गणपतीची एक प्रार्थना कोणती?
अ) रामकृष्णहरि ब) हीच आमुची क) देवा हो देवा ड) वक्रतुंड महाकाय
२८) गणपतीचे एक स्वरूप कोणते?
अ) गणेश ब) गज क) ओमकार ड) ऊकार
२९) कीर्तनात टाळांची साथ करणाऱ्यांना काय म्हणतात?
अ) माळकरी ब) वाघ्नें वारी क) भालकरी ड) टाळकरी
३०) अकार, उकार, मकार हे कोणत्या देवतांचे संबोधन आहे?
अ) राम-सीता-लक्ष्मण ब) ब्रह्मा-विष्णू-महेश क) उमा-महेश-
गणेश ड) निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान
३१)
अ) ब) क) ड)
३२) वेद किती आहेत?
अ) दोन ब) चार क) सहा ड) अठरा
३३) गणपतीला कशाचे फूल आवडते?
अ) जास्वंदी ब) मोगरा क) कण्हेर ड) गुलाब
३४) कीर्तनकारांनी निरुपणादरम्यान वारंवार कोणाचे नामस्मरण केले आहे?
अ) गणपती ब) विठ्ठल विठ्ठल क) रुक्मिणी ड) संत
३५) हत्तीला वश करण्यासाठी वापरले जाणारे हत्यार कोणते?
अ) अंकुश ब) कुश क) गदा ड) आयुध
३६) पुराणांची संख्या किती आहे?
अ) चार ब) अठरा क) बत्तीस ड) चौसष्ट
३७) ‘सुंदर तें ध्यान...’ या अभंगात कोणाचे वर्णन केले आहे?
अ) गणपती ब) पांडुरंग क) शंकर ड) पार्वती
३८) दूध, दही, तूप, मध, साखर या पदार्थांपासून तयार केलेला प्रसाद कोणता?
अ) पंचामृत ब) दुधामृत क) दही-तूप ड) महाप्रसाद
३९) गणपतीचे व्रत कोणत्या तिथीला केले जाते?
अ) पाडवा ब) चतुर्थी क) चतुर्दशी ड) पौर्णिमा
४०) कीर्तनकारांच्या हाती काय असते?
अ) पखवाज ब) टाळ क) चिपळी ड) वीणा
४१)
अ) ब) क) ड)
४२) वारकरी सांप्रदायाचा नामजप कोणता?
अ) राम राम ब) जयजयराम क) राम ड) रामकृष्णहरि
४३) ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणाचा आहे?
अ) संत निवृत्तीनाथ ब) संत नामदेव क) संत ज्ञानेश्वर ड) संत सोपानदेव
४४) ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी कोणत्या देवतेचे वर्णन आहे?
अ) गणपती ब) सरस्वती क) संत ज्ञानेश्वर ड) भगवतगीता
४५) महाभारत कोणी लिहिले?
अ) व्यास ब) वाल्मीकी क) गणपती ड) राम
४६) संत तुकाराम महाराज यांनी गणपतीला काय संबोधले आहे?
अ) विघ्नकर्ता ब) विघ्नें हरि क) सुखहर्ता ड) विनाशक
४७) कीर्तनाचे ठिकाण कोणते?
अ) पंढरपूर ब) देहू क) आळंदी ड) पैठण
४८) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला कोणत्या नावाने संबोधले जाते?
अ) गणेश चतुर्थी ब) विनायक चतुर्थी क) संकष्ट चतुर्थी ड) अनंत चतुर्थी
४९) संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय?
अ) रामायण ब) महाभारत क) भावार्थदीपिका ड) अभंग गाथा
५०) गणपतीचा आवडीचा पदार्थ कोणता?
अ) लाडू ब) मोदक क) जिलेबी ड) पेढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.