पिंपरी-चिंचवड

महिलांनी अनुभवला धम्माल मस्तीचा दिवस

CD

पिंपळे गुरव, ता. २६ : मराठी गाण्यांवर रंगलेला फॅशन वॉक, खुसखुशीत खाद्यपदार्थांचा सुटलेला घमघमाट अन् पारंपारिक संस्कृतीचा साज असलेली मंगळागौर, सोबतीला धम्माल, मज्जा आणि मस्ती... हे दृश्य होते ‘सकाळ श्रावणसरी’ कार्यक्रमाचे.
श्रावण महिन्यातील उत्साह द्विगुणित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तनिष्का गटप्रमुख शीतल शितोळे, उज्वला ढोरे, तृप्ती कांबळे, कोमल गौंडाडकर, रेश्मा शिंदे, ज्योती भोसले, राधिका घोडके, डॉ. कांचन जगताप, जयश्री वगनवार यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील तनिष्का सदस्या आणि इतर महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भर पावसातही नऊवारी साड्या नेसून पारंपरिक दागिने घालून आलेल्या महिलांनी संस्कृतीचे दर्शन घडविले.
यावेळी पाककृती, मंगळागौर, फॅशन वॉक, मी पर्यावरण सखी, सोसायटी टी टाइम, मी टाइम अशा विविध स्पर्धा झाल्या. विजेत्यांना भरघोस बक्षीसे देण्यात आली. महिलांनी वेगवगेळया गाण्यांवर ताल धरत धम्माल करत श्रावणाचा उत्साह आणखी वाढवला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला भाग्यश्री कदम यांनी गणेश वंदना सादर केली. तनिष्का व्यासपीठाचे विभागीय प्रमुख सागर गिरमे यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा प्रमुख रमेश मोरे, आरजू मुलाणी यांनी संयोजन केले. यावेळी उपस्थित महिलांना भेटवस्तूही देण्यात आली.
यावेळी ''एचडीएफसी म्युच्युअल फंड''च्या उत्तरा कोतुळकर यांनी गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंचक जाधव यांनी पर्यावरण जपणूकीची शपथ दिली. ‘रिसर्च आयू’च्या डॉ. वृषाली तुपटकर यांनी आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले. ‘केसरी टूर’च्या मार्केटिंग हेड वंदना मुळे यांनी संवाद साधला. यावेळी प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनही महिलांनी भरपूर बक्षीसे जिंकली.
या कार्यक्रमासाठी ''एचडीएफसी म्युचअल फंड'' हे फायनान्शियल लिटरसी पार्टनर होते. गोदरेज नं १, इंडियन ऑइल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोसायटी टी, केसरी ट्रॅव्हल्स, ''रिसर्च आयु'' हे सहयोगी प्रायोजक होते.
विजेते ः
मंगळागौर ः
१. शालिनी ग्रुप, जुनी सांगवी
२. सिद्ध लक्ष्मी ग्रुप, नवी सांगवी
३. तेजयोग ग्रुप, जुनी सांगवी
उत्तेजनार्थ ः के. के. योगा ग्रुप, जुनी सांगवी, पवनानगर महिला मंडळ
परीक्षक ः सायली मते, अर्चना स्वामी
पाककृती ः
१. वैजयंता क्षिरसागर
२. अश्विनी भुजबळ
३. लीना वरगंटीवार
उत्तेजनार्थ ः वैशाली कुलकर्णी
परिक्षक ः रेखा कुरूमबन्सी, अपर्णा चव्हाण
मराठमोळा फॅशन वॉक ः
१. केतकी गुरव
२. योगिता येवला
श्रावणक्वीन ः संगीता माने
परिक्षक ः डॉ. रितू लोखंडे, डॉ. अमृता भावसार
पर्यावरण सखी ः
१. संगीता माने
२. वृषाली कुलकर्णी
३. सीमा कुंभार
---
‘सक्षम होण्यासाठी गुंतवणूक करा’
प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. म्युच्युअल फंड हा विश्वासार्ह पर्याय असून महिलांनी यामध्ये नक्कीच गुंतवणूक करावी. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक योग्य वेळी उपयोगालाही येऊ शकते, असा सल्ला एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या उत्तरा कोतुळकर यांनी दिला.
....
सिंगल कॉलम फोटो : उत्तरा कोतुळकर
....
फोटो १
नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव : मराठमोळा फॅशन वॉक मध्ये सहभागी झालेल्या तनिष्का सदस्या आणि इतर महिला.


फोटो २
नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव : गाण्यावर ठेका धरून नाचताना तनिष्का सदस्या आणि इतर महिला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT