पिंपरी-चिंचवड

Hinjwadi Metro : गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची झाली ट्रायल रन; कधीपासून सुरु होणार?

Hinjewadi Shivajinagar Metro : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तिसरी मेट्रो मार्गिका आता लवकरच सुरु होणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर एक यशस्वी चाचणी झाली.

CD

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तिसरी मेट्रो मार्गिका पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी-माण अशी आहे. या मार्गावर बुधवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मेट्रो प्रशासनाने माण डेपो ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलापर्यंत यशस्वी चाचणी (ट्रायल रन) पूर्ण केली. याबरोबरच पुणे मेट्रोने आणखी एक टप्पा गाठला आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी (पीसीएमसी) आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गिका होत्या. हे दोन्ही मार्ग शिवाजीनगर न्यायालय (शिवाजीनगर कोर्ट मेट्रो स्थानक) येथे एकत्र येतात. तेथूनच शिवाजीनगर ते हिंजवडी अशी तिसरा मार्गिका सुरू होते. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

या मार्गिकेमुळे पुणे आणि माण-हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क जोडले जाणार आहे. याशिवाय वाकडपाशी पिंपरी-चिंचवड शहर जोडले जाणार आहे. हा पूर्ण मार्ग २३.३ किलोमीटर अंतराचा आहे. यापूर्वी तीन चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मात्र, त्या माण ते हिंजवडी दरम्यानच होत्या. बुधवारी प्रथमच हिंजवडीच्या हद्दीबाहेर मेट्रोने धाव घेतली.

कोंडीतून सुटकेची आशा

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानची मेट्रो सेवा प्रवाशांसाठी फायद्याची ठरणार आहे. विशेषतः आयटीयन्ससाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार असून माण, हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी येथील वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजू सॅमसनने इतिहास रचला, १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; असा पराक्रम करणारा जगातला पहिला खेळाडू

Lagnanantar Hoilach Prem : विंटेज कार, पारंपरिक गाणी आणि चाहत्यांची गर्दी; स्टार प्रवाह मालिकेचा लग्न ट्रॅक कलाकारांसाठी ठरला ऐतिहासिक

Latest Marathi News Live Update : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत वायू गळती, पोलीस तपास सुरु

Ladki Bahin Yojana: जानेवारीनंतर आता फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर, लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५००? महिलांमध्ये नाराजी

Malegaon News : वीज कंपनीचा हलगर्जीपणा की तांत्रिक बिघाड?; उच्चदाब वाहिनीमुळे माती आणि खडक वितळले

SCROLL FOR NEXT