पिंपरी, ता. ३० : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघातांत महिन्याला सरासरी २५ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून भरधाव धावणारी अवजड वाहने, खराब रस्ते, विरुद्ध दिशेने प्रवास, अतिवेग, चुकीचे गतिरोधक, मद्यपान करून वाहन चालविणे या कारणांमुळे अपघात झाल्याचे समोर येते. या वर्षी महिन्याला सरासरी २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
कुटुंबातील एखादा व्यक्ती अचानक गेल्यास कुटुंबावर मोठे संकट कोसळते. रस्ते अपघातातही एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्या कुटुंबावर अशी परिस्थिती ओढवते. अपघात कधी, कुठे व कोणाच्या चुकीमुळे होईल, हे सांगता येत नाही. मात्र, अपघात झाल्यास स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आपल्या हातात आहे. यामुळे दुचाकीवरून प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करण्यासह हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. एकूण अपघातात दुचाकीस्वारांचा अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे.
हेल्मेटचे फायदे
- हेल्मेटमुळे अपघातात मृत्यूचे व दुखापतीचे प्रमाण कमी करता येते.
- डोके, जबडा व चेहरा यांचे रक्षण होते.
- अपघात झाल्यास हेल्मेटमधील फोममुळे डोक्याचे संरक्षण होते.
शहरातील अपघाताचे ब्लॅक स्पॉट
वाहतूक विभाग - ब्लॅक स्पॉट
चाकण तळेगाव चौक, वाकी, मेदनकर वाडी फाटा, साबळेवाडी
देहूरोड किवळे पूल, उर्से टोल प्लाझा, सोमाटणे फाटा, शिंदे पेट्रोल पंप
वाकड - पुनावळे पूल
हिंजवडी - वाकड नाका, भुजबळ चौक
बावधन - चांदणी चौक, ऑडी शोरूमसमोरील रस्ता, रंगला पंजाब हॉटेलसमोरील रस्ता, सुतारवाडी पूल
या वर्षातील प्राणांतिक अपघात
महिना अपघात
जानेवारी - ३२
फेब्रुवारी - २६
मार्च - २९
एप्रिल- ३२
मे - ३२
जून - २७
जुलै - ३४
‘‘प्रत्येक वाहन चालकाने वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासह दुचाकी चालविताना हेल्मेट परिधानही गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.
- विकास पागिरे, वाहनचालक
‘‘रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असून, प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.