पिंपरी-चिंचवड

सर्वांसोबत मैत्रिभाव ठेवणे गरजेचे ः चंद्रकला श्रीजी

CD

पिंपरी, ता. २९ : आकुर्डी येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघात पर्युषण पर्वाअंतर्गत संवत्सरी महापर्व झाले. त्यानिमित्त आयोजित प्रवचनात गुरूवर्या चंद्रकला श्रीजी, स्नेहा श्रीजी, श्रुतप्रज्ञा श्रीजी यांनी मार्गदर्शन केले. सर्वांसोबत मैत्रिभाव ठेवणे गरजेचे आहे, असा संदेश चंद्रकला श्रीजी यांनी दिला.
स्नेहा श्रीजी म्‍हणाल्या, ‘‘संवत्सरी हा क्षमायाचनेचा आणि क्षमा करण्याचा पर्व आहे. जो गेलेला काळ परत येत नाही. तोच खऱ्या अर्थाने संवत्सरीचा संदेश जगतो. वर्ष संपले की आपण कॅलेंडर बदलतो. मात्र एखाद्याच्या बोलण्यातून झालेली दुखापत वर्षानुवर्षं मनात राहाते. स्वतःच्या हजार चुका माफ करतो, तशा दुसऱ्यांच्या चुकाही माफ करायला हव्यात. संतांनी सांगितले आहे की, तीर्थयात्रा करण्याआधी ज्याच्याशी अबोला धरला आहे, त्याच्या घराच्या पायऱ्या चढून जाऊन क्षमा मागा. तेव्हाच खरी तीर्थयात्रा पूर्ण होईल. जन्मपत्रिकेत शनी आणि नात्यांमध्ये दुश्मनी कधीही कामाची नसते. म्हणून कोणासोबतही वैर धरू नका. मंगलमैत्रीचा भाव ठेवा. हेच पर्यूषण आणि संवत्सरीचे खरे तत्त्वज्ञान आहे.’’ श्रुतपर्णा श्रीजी यांनी गायन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Marathe Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Latest Marathi News Live Updates : पुण्यात आजपासून तीन दिवस मद्यविक्री बंद

Maratha Reservation History: सर्वात पहिलं आंदोलन कधी आणि कसं झालं होतं, १९८२ ते २०२५ आतापर्यंत काय घडलं, इतिहास जाणून घ्या?

Chandrakant Patil:'राजकीय आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोलन'; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

MLA Sadabhau Khot: गोरक्षकांकडून ग्रामीण अर्थव्यवस्था संपविण्याचे काम: आमदार सदाभाऊ खोत; 'धर्माचा बुरखा पांघरून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू'

SCROLL FOR NEXT