पिंपरी-चिंचवड

मूर्ती विसर्जन घाटांवर जीवरक्षक नियुक्त

CD

पिंपरी, ता. २९ ः लाडक्या गणरायाचे आगमन बुधवारी (ता. २७) झाले आहे. दीड आणि तीन दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन अनुक्रमे गुरुवार (ता. २८) आणि शुक्रवारी (ता. २९) भाविकांनी केले. गणेशोत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी (शनिवार, ता. ६ सप्टेंबर) होणार आहे. या काळात गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने विशेष उपाययोजना आखली असून, २७ विसर्जन घाटांवर जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे.
गणेशोत्सव काळात विसर्जन घाटांवर गर्दीची शक्यता लक्षात घेऊन दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यापक नियोजन केले आहे. शहरातील प्रत्येक घाटावर जीवरक्षक नियुक्त केले आहेत. त्यांना लागणारे साहित्य लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, दोरी, मेगाफोन इत्यादी उपलब्ध करून दिले आहे. जीवरक्षकांना ओळखता यावे, यासाठी त्यांना अग्निशमन विभागाने ॲप्रन दिले असून, ते परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांसह रबर बोट, पथक आणि संपर्क अधिकारी घाट परिसरात सुसज्ज ठेवले आहेत.

गणेशभक्तांना सूचना
- मूर्ती विसर्जन घाटांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी
- गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी घाटावर गेल्यानंतर नदीपात्रात उतरू नये
- लहान मुलांना पाण्याजवळ एकटे सोडू नये
- रेस्क्यू पथक व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे

घाटनिहाय जीवरक्षक पथक समन्वय अधिकारी (कंसात संपर्क क्रमांक)
- किवळे गाव (पवना नदी), रावेत घाट (जलशुद्धीकरण केंद्र), रावेत भोंडेवस्ती (मळेकर) ः अनिल डिंबळे ः ७२६२०२३३२०
- पुनावळे (राम मंदिर), ताथवडे स्मशान घाट, वाल्हेकरवाडी जाधव घाट, प्राधिकरण गणेश तलाव ः गौतम इंगवले ः ९२७०३१६३१६
- थेरगाव पूल नदीघाट, मोरया गोसावी पवना नदी, केशवनगर (चिंचवड घाट) ः चंद्रशेखर घुळे ः ९९२२२५७९८५
- पिंपरी स्मशानभूमी घाट, सुभाषनगर घाट, काळेवाडी स्मशान घाट ः बाळासाहेब वैद्य ः ९८२२७७४०४९
- काटे पिंपळे घाट, पिंपळे गुरव घाट, पिंपळे निळख घाट, वाकड गावठाण घाट, कस्पटे वस्ती घाट ः विजय घुगे ः ८८८८८३७५४३
- सांगवी स्मशान घाट, सांगवी दशक्रिया घाट, सांगवी वेताळबाबा मंदिर घाट ः सुनील फरांदे ः ७३८१८१२७०१
- कासारवाडी स्मशानभूमी घाट, फुगेवाडी स्मशानभूमी घाट, बोपखेल घाट ः दिलीप गायकवाड ः ९७६७३०५३२४
- चिखली स्मशान घाट, मोशी नदीघाट ः विनायक नाळे ः ९३७०९१५५७६
- मोशी खाण (इ) प्रभाग ः विकास नाईक ः ९८५०८९०४०३

‘‘गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन महापालिकेकडून नियोजन केले आहे. २७ अधिकृत विसर्जन घाटांवर प्रशिक्षित जीवरक्षक, अग्निशमन वाहनांवर रेस्क्यू बोटी, आपत्कालीन संपर्क यंत्रणा आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध ठेवली आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

‘‘अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून घाटांवर सतत गस्त ठेवण्यात येणार आहे. रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रशिक्षित पथक, लाइफ जॅकेट्स, लाइफ रिंग्स, अग्निशमन वाहनांवर बोटी आणि बचावासाठी आवश्यक साहित्य तयार आहे. नागरिकांनी विसर्जन घाटावर खोलवर पाण्यात जाणे टाळावे. मदतीची गरज असल्यास रेस्क्यू पथकाशी तत्काळ संपर्क साधावा.
- उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT