पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

पिंपरी : नेरे दत्तवाडी येथे एकाच कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने तरुणीशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनील पराळे (वय २६, रा. मारुंजी, हिंजवडी) याला अटक केली आहे. पीडित महिला आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. आरोपीने फिर्यादीला विश्वासात घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने ‘तुझी जात वेगळी आहे’ असे म्हणत तिच्याशी लग्न करण्यास नकार देत तिची फसवणूक केली.

हॉटेल व्यावसायिकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा

पिंपरी : हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून त्याचे दुकान तोडल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महाळुंगे एमआयडीसी येथील निघोजे जवळ घडली.
याप्रकरणी सुशेन गटकळ (रा. निघोजे, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दत्ता सूर्यवंशी (वय ४५), आदित्य सूर्यवंशी (वय २१), प्रतीक सूर्यवंशी (वय २१, सर्व रा. गणेशनगर, निघोजे), एक महिला आणि अल्पवयीन मुलगा या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी त्यांच्या अंडा-भुर्जीच्या दुकानावर मित्रांसोबत जेवण करीत असताना आरोपी दत्ता तेथे आला. किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत दत्ता याने फिर्यादीला शिवीगाळ करीत त्याच्यासोबत झटापट केली. त्यानंतर आरोपीने पत्नी आणि मुलांसोबत परत येऊन लोखंडी पट्टी फेकून मारल्याने फिर्यादीच्या कपाळाला दुखापत झाली. आरोपींनी फिर्यादीला पकडून ठेवले तर दत्ता याने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर आणि हातावर मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या दुकानातील खुर्च्या आणि टेबल तोडून नुकसान केले.


पिस्तूल, कोयते बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

पिंपरी : चिंचवड येथे बेकायदारित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन कोयते जप्त करण्यात आले आहे.
उज्वल लवे (वय २३, रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून उज्वल याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, एक काडतूस आणि दोन कोयते अशी एकूण ५१ हजार १०० किमतीची शस्त्रे सापडली.

चांदीच्या कड्याला सोन्याचा मुलामा देवून फसवणूक

पिंपरी : सराफाच्या दुकानात एका व्यक्तीने सोन्याचे कडे विकण्याच्या बहाण्याने दुकान मालकाची १ लाख ३० हजारांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथील चापेकर चौकाजवळील एका दुकानात घडली.
अमोल बलदोटा (वय ३३, रा. मोहननगर, धनकवडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने सराफाच्या दुकानात येऊन सोन्याचे कडे विकायचे असल्याचे सांगितले. त्याने चांदीच्या कड्याला सोन्याचा मुलामा देऊन ते सोन्याचे कडे आहे असे भासवले. त्यानंतर फिर्यादीकडून १ लाख ३० हजार रुपये घेतले आणि त्याची फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT