सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रशासनाने पुणे मनपा ते हिंजवडी फेज-३ (मार्ग क्रमांक १००) मार्गात पंधरा दिवसांपूर्वी केलेला बदल प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरला आहे. वाकड मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने हा मार्ग पूर्ववत करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
हा बस मार्ग बदलण्यापूर्वी वाकड मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांची सोय होत होती. आता योग्य बसअभावी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. ही बस पुणे मनपा ते हिंजवडी फेज ३ आधी विशालनगर, वाकड मार्गे धावत होती. वाकड आणि लगतच्या परिसरातून पुणे मनपा आणि हिंजवडी परिसरात शाळा आणि महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची या मार्गावरील संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांना ही बस उपयुक्त ठरत होती. कामानिमित्त पुण्यात जाणाऱ्यांचीही सोय होत होती.
पंधरा दिवसांपूर्वी पीएमपीएमएल प्रशासनाने या बस मार्ग बदलून पिंपळे निलख गावातून नंतर डीपी रोडहून हिंजवडी असा केला. त्यामुळे विशालनगर येथील प्रवाशांना डीपी रोड पर्यंत पायपीट करावी लागते. याशिवाय विशालनगर ते हडपसर ही बस कोरोना काळात बंद करण्यात आली. ती सुद्धा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
---
‘पिंपळे निलख येथून बस क्र. ९६,१२६,३३३, आणि ३४४ धावत असून बस क्र.१०० पिंपळे निलख गावातून नेण्याचा अट्टहास कशासाठी ? वास्तविक विशालनगर येथील लोकसंख्या पिंपळे निलख गावापेक्षा जास्त आहे. तरीही या बसच्या मार्गात बदल केला आहे. प्रशासनाने बस मार्ग पूर्ववत न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
- गोविंद गायकवाड, प्रवासी विशालनगर, पिंपळे गुरव
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.