पिंपरी-चिंचवड

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार क्षेत्रभेट

CD

(प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय)
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार वाणिज्य विभागातर्फे क्षेत्रभेट अभ्यास विषयावर डॉ. रामदास लाड यांचे व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट अभ्यासाचे महत्त्व, त्याचा फायदा, प्रकल्प अहवाल कसा करावा? याची माहिती दिली. प्रकल्प अहवालामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवाद, पत्रव्यवहार, संगणकीय ज्ञान, व्यावसायिक जागरूकता आणि व्यक्तिमत्त्व विकास असे कौशल्य विकसित होतात. त्याचा उपयोग नोकरीसाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी होतो. अधिष्ठाता डॉ. पद्मावती इंगोले, प्रा. डॉ. सुनील लंगडे, प्रा. संजय भाई उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. मधुकर राठोड, डॉ. एच. बी. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

केन्स सेमिकॉन समवेत सामंजस्य करार
(डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ)
डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आकुर्डी आणि केन्स सेमिकॉन साणंद गुजरात यांनी सेमिकंडक्टर शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवून आणणे आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार झाला. त्यावर केन्स सेमिकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघू पनिकर आणि विद्यापीठाचे कुलगुरू मनीष भल्ला यांच्या स्वाक्षरी झाल्या. याअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप संधी, संयुक्त संशोधन प्रकल्प, प्राध्यापक प्रशिक्षण, ज्ञान देवाण-घेवाण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विकास यांसारख्या उपक्रमांवर सहकार्य करण्यात येणार आहे. सैद्धांतिक शिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव यामधील दरी कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णता व उद्योगाभिमुख कौशल्य विकसित होईल. पनिकर यांनी भारतातील वाढत्या सेमिकंडक्टर व्यावसायिकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उद्योग-शैक्षणिक सहकार्य अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. कुलगुरू भल्ला म्हणाले, ‘‘सामंजस्य करारामुळे विद्यापीठाच्या जागतिक स्तरावर उद्योगाभिमुख शिक्षण देण्याच्या दृष्टीला बळ मिळेल आणि भारताच्या ‘ग्लोबल सेमिकंडक्टर हब’ होण्याच्या ध्येयात हातभार लागेल.’’

देहूत सायबर सुरक्षिततेचे धडे
(डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय)
डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय संगणक विभाग आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यातर्फे ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत देहू येथील संत तुकाराम महाराज गुरुकुलात ‘सायबर सुरक्षा’ आणि ‘डिजिटल फसवणूक’; ऑनलाइन धोक्यांपासून कसे सुरक्षित राहायचे, याचे धडे मिळाले. ‘सायबर वॉरियर्स’ अदिती वाबळे आणि सिद्धांत हत्ते यांनी संयोजन केले. आर्थिक फसवणूक, ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘लिंक बेटिंग’, ‘सोशल इंजिनिअरिंग’ अशा गुन्ह्यांबद्दलची माहिती दिली. अनिकेत महाराज मोरे यांनी कौतुक केले. समन्वयक प्रा. सत्यवान कुंजीर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. रणजीत पाटील यांनी कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

माझे महाविद्यालय, माझे स्वच्छता अभियान
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज, मोशी)
मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज, मोशी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ‘माझे महाविद्यालय, माझे स्वच्छता अभियान’ उपक्रम राबवला. स्वच्छतेची शपथ घेतली. विद्यार्थिनींनी अंगठ्याचा हिरव्या रंगाचा ठसा पोस्टरवर देत स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. घोषणा देत रॅली काढून स्वच्छतेचा संदेश दिला. वर्गखोल्या, प्रयोगशाळा, प्रवेशद्वार परिसर, औषधी वनस्पती उद्यानात स्वच्छता केली. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमही राबवला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांचे प्रोत्साहन मिळाले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी रेखा भालेराव व इनचार्ज प्राची दुसाने यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवला. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले, उपप्राचार्य डॉ. वृषाली तांबे यांनी मार्गदर्शन केले. सानिया शिंदे, श्रद्धा यादव, रोशनी कोळसे आदींनी संयोजन केले. गणेश कदम व ज्योतिनंद हिरवे यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोर्टाचा आदेश, प्रशासनाला कारवाई करावीच लागेल; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, आडमुठेपणा अन् इगो ठेवून चर्चा अशक्य

Maratha Reservation : मारोतीच्या मंदिरासमोर बाजरी,ज्वारी भाक-या अन् चटणी व लोणचं आणा हो..! गेवराईतून मायेची शिदोरी मुंबईला रवाना

Dhanashree Verma: चहलला अजूनही मेजेस करते धनश्री? स्वत:च केला खुलासा; काय म्हणाली वाचा

Pune News : धर्मवादी दबावामुळे जावेद अख्तर यांचा कार्यक्रम रद्द; सत्यशोधक मंडळाचा पाठिंबा

'आमदार खताळ यांनी वारंवार पोलिस गाड्या पाठवून माझ्या मुलाला धमकावलं, त्याला ब्लॅकमेल केलं'; आरोपीच्या आईचे तक्रारीत मोठे गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT