पिंपरी-चिंचवड

स्वच्छतेची जबाबदारी सर्वांचीच

CD

पिंपरी, ता. ३१ : केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत गेल्या वर्षी स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धा घेतली होती. त्यात पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, ‘सेव्हन स्टार गार्बेज फ्री सिटी’ आणि ‘वॉटर प्लस’ मानांकन मिळविले आहे. शहर स्वच्छतेबाबत महापालिका वेगवेगळे प्रयत्न करत आहे. मात्र, काही ठिकाणी रस्ते व नाल्यांच्या कडेला, लोहमार्गालगत, नदी काठी कचरा पडलेला असतो, याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेचे मूल्यांकन केले जाते. २०२४ च्या स्पर्धेमध्ये देशातील चार हजार ५८९ शहरांनी भाग घेतला. त्यात पिंपरी-चिंचवडने देशात सातवा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कचरा किंवा राडारोडा उघड्यावर टाकणाऱ्यांवर महापालिका दंडात्मक कारवाईही करत आहे. असे असताना बहुतांश रस्त्यांच्या कडेला, शहराच्या सीमेलगत, नदी-नाल्यांच्या कडेला, महामार्गांलगत कचरा आढळत आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छताही दिसत आहे. दुर्गंधीचा त्रास जाणाऱ्या-येणाऱ्यांना होतो.

महापालिकेच्या मते...
‘‘कचरामुक्त पिंपरी-चिंचवडसाठी महापालिका संपूर्ण शहरात कचऱ्याचे घंटागाडीद्वारे संकलन करत आहे. घरोघरीच कचऱ्याचे ओला, सुका, काच, प्लॉस्टिक असे वर्गीकरण करून घंटागाडीत दिले जात आहे. शिवाय, कचरा संकलन केंद्रांमध्येही विलगीकरण केले जाते. मोशी कचरा डेपोत कचऱ्याच्या प्रकारानुसार काही प्रमाणात पुनर्वापर केला जात आहे. उर्वरित कचऱ्याची शास्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी प्रक्रिया युनिट्स, कंपोस्टिंग, री-सायकलिंग प्लांट, बायोगॅस यंत्रणा आदींचा वापर केला जात आहे.,’’ अशी माहिती प्रशासनाने दिली.

मोठ्या प्रमाणात कचरा आढळणारी ठिकाणे
- पुणे-नाशिक महामार्ग नाशिक फाटा ते भोसरीदरम्यान दोन्ही बाजूस
- वाकड येथे हिंजवडी व मारुंजी सीमेवरील लिंक रस्त्याच्या कडेला
- चऱ्होलीतील दाभाडे वस्तीजवळ इंद्रायणी नदी पुलाजवळ
- दापोडी ते आकुर्डीदरम्यान लोहमार्गाच्या दोन्ही बाजूस
- पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या कडेला

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई (२०२४-२५)
व्यक्ती : ७,२१४
दंड वसूल : दीड कोटी रु.

कारवाईची कारणे
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
- लघुशंका व शौच करणे
- राडारोडा, कचरा टाकणे
- कचरा रस्त्यावर जाळणे
- डासोत्पती ठिकाणांकडे दुर्लक्ष
- कचऱ्याचे वर्गीकरण न करणे
- जाहिरातींची भित्तीपत्रके लावणे
- वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकणे
- बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर

नागरिकांनी उघड्यावर कचरा, राडारोडा टाकू नये. लघुशंका करू नये. घरोघरचा कचरा पाच प्रकारात वर्गीकरण करून गोळा केला जात आहे. ओला, सुका, घातक, प्लास्टिक व वैद्यकीय अशाप्रकारे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून शहर विद्रूप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
- सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rule Change 1 September: आजपासून बदलले 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Maratha Reservation: मुंबईत मराठा कार्यकर्त्यांचा ओघ सुरुच; ऐरोलीत पोलिसांचा फौजफाटा तैनात

Devendra Fadnavis: कितीही शिव्या दिल्या तरी बाबासाहेबांच्या संविधानाच्या बाहेर जाणार नाही, फडणवीसांनी जरांगेंना ठणकावून सांगितलं

Live Breaking News Updates In Marathi: आमदार अभिजीत वंजारी यांच्या नाम फलकावर काळे फासले

Besan Modak Recipe: मोरश्वरासाठी सहाव्या दिवशी बनवा स्वादिष्ट बेसण मोदक, बाप्पा होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT