पिंपरी-चिंचवड

देखावे पाहण्यासाठी सुटीचा मुहूर्त

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ ः शहरातील गणेश मंडळांनी यंदा सामाजिक संदेश देणारे विविध देखावे साकारले आहेत. रविवारच्या सुट्टी असल्यामुळे गणेशभक्तांनी शनिवारी रात्रीपासून देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती.
शहरातील सर्वच भागांत गणेश मंडळांच्या देखाव्यांपाशी गर्दी झाली होती. मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर हेच चित्र होते. ठिकठिकाणी खाद्यपदार्थ, खेळणी विक्रेत्यांनाही चांगली कमाई झाली.
पिंपरी चिंचवड शहर आणि उपनगरात दोन हजारांहून जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात गणेशमूर्तीसह भव्य सभामंडप, विद्यूत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पौराणिक व सद्यःस्थितीवर आधारित देखावे साकारण्यात आले आहेत. अनेक गणेश मंडळांनी यंदा सामाजिक संदेश देणारे देखावेही उभारले आहेत. अनेक मंडळांनी सायबर क्राइम, शूर हो विर हो शिवरायांची तलवार हो, अवयवदान श्रेष्ठ दान अशा विषयांवर जिवंत देखावे साकारले आहेत.
राज्यातील कानाकोपऱ्यातून देखावे पाहण्यासाठी पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातही आले आहेत. गणेश मंडळांच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्रेते, खेळणी विक्रेते, विविध साहित्य विक्रेत्यांनी स्टॉल मांडले होते. भाविकांची स्टॉलवर गर्दी पाहायला मिळाली. काही गणेश मंडळांनीही पिण्याच्या पाण्याची आणि खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध केली आहे, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्गही देखावे पाहण्यासाठी आले होते. यामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. गणेश भक्तांच्या सोयीसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल सेवा सुरु असल्यामुळे गणेश भक्तांचा प्रवास सुखकर झाला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT