पिंपरी-चिंचवड

लाडक्या गणारायाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप

CD

पिंपरी, ता. ५ ः दहा दिवस घरी आलेल्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर शनिवारी विघ्नहर्त्याचे उद्या (ता. ६) विसर्जन करण्यात येणार आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर’ असे साकडे घालत गणेशभक्त लाडक्या गणेशाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करतील.
घरोघरी विराजमान झालेल्या तसेच सार्वजनिक गणेश मंडळे, सोसायट्या, सामाजिक संस्थांच्याही गणपतींचे विसर्जन केले जाईल. गणेशोत्सवाची सुरवात ज्या उत्साहाने झाली त्याच उत्साहात सांगताही होणार आहे. यामध्ये चिंचवड व पिंपरीतून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका हे खास वैशिष्ट्य असणार आहे.
पिंपरीतील कराची चौक आणि चिंचवड येथील चापेकर चौकातून अनेक मंडळे मार्गस्थ होतात. यासाठी महापालिकेच्या वतीने या दोन्ही चौकांमध्ये स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत.

चिंचवडच्या मिरवणुकांचे वैशिष्ट्य
ढोल ताशांचा गजर, बॅंड पथक वारकऱ्यांचे पथक, मोठमोठे चित्ररथ, विविध संकल्पना घेऊन साकारण्यात आलेले देखावे ही चिंचवडमधील विसर्जन मिरवणुकांची वैशिष्‍ट्य असतील. चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन या परिसरातील गणेश मंडळांच्या मिरवणुका चापेकर चौकातून मार्गस्थ होतील. येथील मिरवणुकांचे स्वरूप नेहमीच पारंपारिक पद्धतीचे राहिले आहे. त्यामुळे येथील मिरवणुक पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम या मंडळाने यंदा शिवस्वराज्य भवानी रथ साकारला आहे. तर, मानाचा गणपती असणाऱ्या नवतरुण मित्र मंडळाच्या गणरायाची मिरवणूक विद्युत रोषणाई केलेल्या रथातून मार्गस्थ होईल. चिंचवड राजा अशी ख्याती असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्‍वर मंडळाच्या मिरवणुकीत वारकरी पथक, बॅंड पथक, ढोल-ताशा पथक यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी चारच्या सुमारास मिरवणुकीला सुरवात होईल. विसर्जन मिरवणुक रात्री १२ पर्यंत संपवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका मंडळांनी घेतली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, बसल्या बसल्या सही घेतली का? राज ठाकरेंचा आरोप; निवडणूक अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

मोठी बातमी! 21 नोव्हेंबरला DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? सिद्धरामय्यांचं काय होणार? काँग्रेस सरकारवर मोठं संकट

Sikandar Shaikh Crime : पैलवान सिकंदर शेखच्या अटकेनंतर घरच्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

Kabutarkhana: चार नवीन कबुतरखान्यांसाठी परवानगी, पण बाकीचे बंदच...; पालिकेचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची समझोता बैठक मुंबईत सुरु

SCROLL FOR NEXT