पिंपरी, ता. १० : शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान नागरिकांसाठी फायद्याचे ठरत आहे. या अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिल कार्यालयातर्फे नुकतेच महसूल सप्ताह राबविण्यात आला. यात एका आठवड्यात विविध प्रकारचे तब्बल एक हजार १९६ दाखले नागरिकांना देण्यात आले.
राज्यात एक ते सात ऑगस्ट दरम्यान १६ ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुणे शहर, पुरंदर, बारामती, भोर, मावळ, मुळशी, वेल्हा, शिरूर, हवेली, लोणी काळभोर आणि पिंपरी चिंचवड येथे अभियान विविध ठिकाणी राबविण्यात आले. दौंड तालुक्यात सर्वाधिक दोन हजार २३, तर लोणी काळभोरमध्ये २२० दाखले देण्यात आले. पिंपरी-चिंचवड कार्यालयांतर्गत उत्पन्नाच्या दाखल्याचे जास्त वाटप झाले.
या उपक्रमाचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना झाला. त्यासाठी विविध शाळांतील नऊ प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. शैक्षणिक प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर दाखले वाटप झाले. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना आवश्यक प्रमाणपत्रांची माहिती देण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांच्या प्रकरणाचीही तजवीज करण्यात आली. एकूण ३२ स्थानिक नामवंत व लोकप्रतिनिधींनी अभियानाच्या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले.
---
दाखल्यांचा तपशील
- अधिवास प्रमाणपत्र : १२७
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र : २२०
- उत्पन्न दाखला : ३२०
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र : १५५
- जात प्रमाणपत्र : ४५
- आधार कार्ड : १८४
- शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले : १४५
---
शासनाच्या सूचनेनुसार राबविलेल्या महसूल सप्ताहात विविध प्रकारचे दाखले वाटप करण्याची कार्यवाही केली आहे. नागरिकांचाही याला मोठा प्रतिसाद मिळाला. एक हजार पेक्षा अधिक दाखले दिले आहेत. काही अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.