पिंपरी-चिंचवड

कोचिंग क्लास व ज्युनिअर कॉलेज

CD

‘इंटिग्रेटेड’चे गौडबंगाल ः ३

पंधरा हजारांचे शिक्षण लाखांच्या घरात

आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांची स्थिती गंभीर

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः महाविद्यालयांनी खासगी क्लासेसशी ‘टायअप’ केल्याचा मोठा आर्थिक फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसत आहे. जे शिक्षण १५ ते २० हजार रुपयांत पूर्ण होते, त्यासाठी लाखाच्या घरात गेले आहेत. सधन असलेले पालक शुल्क भरू शकतात. परंतु, गरीब पालकांचे काय? महाविद्यालयात शिकवले जात नाही, शिकवणी लावू शकत नाहीत, अशा मुलांनी दहावीनंतर शिक्षण कसे घ्यायचे? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. ही स्थिती भविष्यात आणखी गंभीर होऊ शकते.
उच्च शिक्षण गरिबांसाठी ‘दिवास्वप्न’ ठरत आहे. पूर्वी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थित शिकवले जायचे, त्यामुळे खासगी क्लासची गरज लागत नव्हती. मात्र, आता महाविद्यालयांमध्ये वर्ग ओस पडले आहेत. विद्यार्थी क्लासमध्ये जात असल्याने प्राध्यापक शिकविण्यास विशेष रस घेत नाहीत. परिणामी, विद्यार्थी महाविद्यालयात गेले तरी शिकवले जात नाही आणि शिकायचेच असेल तर खासगी क्लासची महागडी फी भरा, असा प्रकार सुरू आहे. महाविद्यालयांनी दर्जेदार शिक्षण देणे अपेक्षित असते. मात्र, आज ते व्यावसायिक लाभासाठी खासगी क्लासेसच्या संगनमताने विद्यार्थ्यांची लूट करत आहेत. सरकारने अशा शिक्षणाच्या बाजारीकरणाला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत.

अशीही वस्तुस्थिती...
- काही टायअप क्लास दीड ते तीन लाख शुल्क आकारतात
- टायअप महाविद्यालयांचे शुल्क ११ ते २० हजार रुपये
- काही टायअप क्लासेस जेईईच्या तयारीसाठी दोन ते तीन लाख शुल्क आकारतात
- काही टायअप क्लासेस केवळ सीईटीच्या तयारीसाठी एक ते दोन लाख शुल्क घेतात
- खासगी क्लासेसमध्येच घेतले जाते महाविद्यालयाचे शुल्क
- काही क्लासेसमध्ये एका विषयाचे वार्षिक शुल्क ४० हजार रुपये
- पालकांचा पेहराव आणि आर्थिक स्थिती बघून क्लासेसच्या शुल्काची ‘बार्गेनिंग’ होते

टायअप नसलेल्यांचे ‘उद्योग’
ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांचे खासगी क्लासबरोबर टायअप नसते. मात्र, विद्यार्थी महाविद्यालयात आला नाही तरी ही महाविद्यालये भागवून घेतात. विद्यार्थ्यांची हजेरी एकाच दिवसात भरून त्याला परीक्षेस पात्र ठरवले जाते. अशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ काही क्लासमध्ये प्रात्यक्षिकांसाठी आणि वार्षिक परीक्षेसाठी जावे लागते. अशा महाविद्यालयातील विद्यार्थी शहरात खासगी क्लाससाठी येतात. म्हणजेच शिक्षण खासगी क्लासमध्ये आणि परीक्षा आपल्या महाविद्यालयात अशी परिस्थिती संबंधितांची असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : जेद्दाहहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईट ६ई ६८ ला सुरक्षेचा धोका

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT