पिंपरी, ता. २४ : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील अर्जदारांना निवड यादीसह प्रतीक्षा यादी १ आणि २ मधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ त्या तत्वावर सदनिका मिळणार आहेत. यासाठी किवळे येथील प्रकल्पातील सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परंतु, यातील अर्जदारांनी संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास विलंब केला आहे. आता पुन्हा महापालिकेने मुदतीत कागदपत्रे मागवून घेतली आहेत.
किवळे येथील प्रकल्पाअंतर्गत एकूण ७५५ सदनिका उपलब्ध होणार आहेत. एका सदनिकेची किंमत १३ लाख ७१८ इतकी निश्चित करण्यात आली आहे. योजनेच्या निवड व प्रतीक्षा यादीतील इच्छुक अर्जदारांनी ९ मेपर्यंत कागदपत्रांसह संमतीपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
मुळात आवास योजनेतील लाभार्थ्यांचा आर्थिक दुर्बल घटकातील घरे घेण्यास विरोध होत आहे. रावेत आवास योजना प्रकल्प जवळपास बारगळल्यात जमा आहे. त्यामुळे या प्रकल्पातील घरांच्या बदल्यात लाभार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकासाठीची घरे दिली जात आहेत. त्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड (कुटुंबातील सर्व सदस्यांचे), पॅन कार्ड (अर्जदार व सह-अर्जदार), जातीचा दाखला (अर्जदार), मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, चालू महिन्याचे वीज बिल, उत्पन्नाचा दाखला (२०२४-२५) /आयटीआर/ फॉर्म १६,
अधिवास प्रमाणपत्र, भाडे करारनामा किंवा संमतीपत्र (ज्यांना स्वत:ची जागा नाही), दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
येथे जमा करावीत कागदपत्रे
- झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, २०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी, चिंचवडगाव-४११०३३, वेळ - सकाळी १०.३० ते सायं. ५.००
किवळे येथील सदनिका मिळविण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही एजंटांच्या प्रलोभनास बळी पडू नये. ज्यांना योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी संमतीपत्राचा नमुना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडून घेऊन जावा व कागदपत्रांसह सादर करावा.
- अण्णा बोदडे, उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.