पिंपरी-चिंचवड

थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई; लिलावाची शक्यता

CD

पिंपरी, ता. २६ : महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागामार्फत शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याबाबत यापूर्वीच जप्तीपूर्वीची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. आता चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या बिलासोबतच अंतिम जप्तीपूर्व नोटीस वाटप सुरू आहे. यामुळे आता थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करून मालमत्तेचा लिलाव काढण्यात येणार आहे.
शहरातील मालमत्ताधारकांना चालू वर्षाची मालमत्ता कराची बिले वाटप सुरू आहेत. मागील आर्थिक वर्षात मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत पहिल्या सहामाहीसाठी ३० सप्टेंबर आणि दुसऱ्या सहामाहीसाठी ३१ डिसेंबर अशी होती. तरी, तब्बल ७१ हजार ९९९ थकबाकीदारांनी निर्धारित वेळेत कर भरला नाही. त्यामुळे या थकबाकीदारांवर प्रत्येक महिन्यासाठी दोन टक्के शास्ती (दंड) लागू करण्यात आला आहे. संपूर्ण थकबाकी भरेपर्यंत शास्ती लागू राहणार आहे. अशा थकबाकीदारांना चालू वर्षाच्या बिलासोबत अंतिम जप्तीपूर्व नोटीस वाटपाचे काम सुरू आहे.
मार्च २०२५ पूर्वीची मालमत्ता कर बिलाची थकबाकी असणाऱ्या ७१ हजार ९९९ थकबाकीधारकांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर केवळ सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात येणार आहे. मालमत्ता थकबाकीदारांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.pcmcindia.gov.in) ऑनलाइन पेमेंट गेटवे, RTGS, BBPS किंवा विभागीय कार्यालयांतील थेट भरणा केंद्रांद्वारे रक्कम भरता येईल. आर्थिक अथवा अन्य कारणास्तव कर भरता न आल्यास समाधानकारक कारण लेखी स्वरूपात सात दिवसांत महापालिकेस सादर करणे आवश्यक आहे.

‘‘महापालिकेच्या महसुलामधून शहरातील पायाभूत सेवा, रस्ते, उद्याने, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांचे संचालन व विकासकार्य चालते. त्यामुळे प्रत्येक करदात्याची जबाबदारी आहे की, त्यांनी वेळेत व नियमित कराचा भरणा करावा. ही अंतिम संधी लक्षात घेऊन तत्काळ थकबाकी भरावी आणि जप्तीची कारवाई टाळावी.
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT