पिंपरी-चिंचवड

पवना परिसरातील नदी बंधाऱ्यांवर गर्दी; पोहताना काळजी घेण्याचे आवाहन

CD

सोमाटणे, ता. २६ : उन्हाच्या तीव्रतेमुळे पवना नदी आणि परिसरातील बंधाऱ्यांवर पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, पोहताना काळजी घेण्याची गरज आहे.
मार्चपासून वाढलेल्या उष्णतेमुळे तरुणाईची पावले पोहण्यासाठी पवना नदी व नदीवरील बंधाऱ्याकडे वळत आहेत. परंतु, थोड्याशा निष्काळजीपणाने जिवावर बेतू शकते, हे लक्षात घेऊन लहान मुलांबरोबर पालकांनीही नदी, बंधाऱ्यावर पोहण्यासाठी जाताना योग्य सुरक्षा साधने जवळ घेऊन दक्षता पाळण्याची गरज आहे. त्यातच सध्या शाळांना सुट्टी, गावोगावी यात्रा असल्याने पाहुण्यांचा ओघ अधिक असून, दुपारच्या वेळी थंड पाण्यातील पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पाहुणे कासारसाई व पवना नदीवरील पोहण्याचे ठिकाण असलेल्या सांगवडे, गहुंजे, शिरगाव, सोमाटणे, धामणे, परंदवडी, बेबडओहोळ, शिवणे, थुगाव, कडधे, शिवली, कोथुर्णे येथील बंधाऱ्यावर गर्दी करत आहेत. मात्र, काही ठिकाणी खोल खड्डे, शेवाळ, झाडांची मुळे, तसेच धरणातून सोडले जाणारे पाणी यामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो आणि त्यातून अपघाताची शक्यता अधिक असते. गेल्या काही वर्षांत नदीपात्रात अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

‘‘सध्या तापमान जास्त असल्याने मुलांसह पालकही पोहण्यासाठी येत आहेत. मात्र, प्रत्येकाने आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.’’
- राजेश मुऱ्हे, माजी सरपंच

‘‘कासारसाई धरण परिसरात पोहण्यास बंदी आहे. गर्दीच्या दिवशी आमचे कर्मचारी लक्ष ठेवतात.’’
- अमर धायगुडे, शाखा अभियंता

‘‘धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावले असून, अशा ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये.’’
- तेजस्विनी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिरगाव
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT