सकाळ वास्तू एक्स्पोला नागरिकांसह विकसकांच्या प्रतिक्रिया :
......
‘‘चऱ्होली येथे आमचा चारशे एकर जागेत प्राइड वर्ल्ड सिटी नावाचा प्रोजेक्ट आहे. ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सद्यःस्थितीत साडेचार हजार सदनिकाधारक येथे वास्तव्यास आहेत. शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, मॉल आदींसह ७५ एकर जागा सेझसाठी राखीव ठेवण्यात आली. मुलांना केजीपासून पीजीपर्यंतचे उच्च दर्जाचे शिक्षण याच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सकाळच्या एक्स्पोमुळे आम्हाला ग्राहकांपर्यंत पोहचण्याचे एक उत्तम व्यासपीठ मिळाले.
- रोशन आरा, महाव्यवस्थापक, ब्राइड ग्रुप.
.....
‘‘सर्व प्रोजेक्ट शहरातील मोक्याच्या जागेत असल्याने आम्हाला स्ट्रॅटेजिक लोकेशन अवॉर्ड मिळाला आहे. वाकडमध्ये अर्बर व्हिस्टा नावाने २३ मजली इमारतीचा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टच्या बाजूला हाकेच्या अंतरावर मेट्रो, पीसीएमसीचे थांबे आणि मॉल आहेत. आयटी पार्क व शैक्षणिक संकुलजवळ असल्याने ग्राहकांच्या सोयीचे ठरणार आहे. सर्व सुख सुविधायुक्त प्रोजेक्ट आपल्या सेवेत सादर आहेत.
- शुभम सुराणा, ए. के. डेव्हलपर्स.
....
नागरिकांच्या प्रतिक्रिया :
शहराच्या मध्यवर्ती भागात ‘सकाळ’ने एक्स्पो भरविल्याने भेट देणे सोयीचे ठरले. आम्हाला चिंचवड भागातच फ्लॅट हवा होता. एक्स्पोमुळे योग्य माहिती मिळाली असून, परवडणाऱ्या किमतीत फ्लॅट उपलब्ध आहेत.
- मधुली वाणी, चिंचवड.
....
‘‘एक्स्पोचे नियोजन अतिशय उत्तमरीत्या करण्यात आले आहे. कमी किमतीत हव्या असलेल्या ठिकाणी प्रोजेक्ट उपलब्ध आहेत. मोशी-डुडुळगाव येथील अक्षत प्रोजेक्ट पसंतीस पडला आहे. बुकिंगचे नियोजन सुरू असून, प्रोजेक्टला भेट देणार आहे.
- संजय पाटील, शिवाजीनगर.
...........
‘‘एक्स्पोमुळे शहरातील विविध प्रोजेक्टबाबत माहिती मिळाली. आम्ही घरासाठी जागेच्या शोधात होतो. या ठिकाणी आल्यावर जागेच्या किमती त्याबाबत सविस्तर माहिती मिळाली. पुढील एक्स्पोमध्ये आणखी स्टॉल असले तर ग्राहकांच्या सोयीचे ठरेल.
- इंद्रजित जगताप, चिंचवड.
...
एक्स्पोमध्ये विकसकांच्या टीमने अतिशय छान माहिती दिली. आम्ही अजमेरामध्ये राहत आहे. त्यामुळे जवळच परवडणाऱ्या किमतीत घर शोधत होतो. या एक्स्पोमुळे हा शोध थांबला असून, चिंचवड येथील पॅनोरेव्हाला भेट देण्याचे ठरविले आहे. शनिवार, रविवार सुटीचा दिवस असल्याने प्रोजेक्ट पाहून फ्लॅट बुक करणार.
- प्रेमा जोगदंड, अजमेरा-पिंपरी.
फोटो ः 09609, 09610, 09611, 09612, 09613, 09614
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.