प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २६ : अल्प दरातील आणि हक्काच्या घराचा ताबा नागरिकांना लवकरच मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) वतीने उभारण्यात येणाऱ्या साडेसहा हजार सदनिकांच्या बांधकामचे सध्या ६५ टक्के काम झाले आहे. जुलै २०२५ मध्ये ते पूर्ण करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे घरकुल दिले जाणार आहे.
‘पीएमआरडीए’च्या वतीने सेक्टर १२ येथील पहिल्या टप्प्यातील गृहप्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील गृहप्रकल्पाची कामे हाती घेतली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ४ हजार ८८३ सदनिका उभारण्यात आलेल्या होत्या. ऑनलाइन लॉटरी पद्धतीने येथील सदनिका लाभार्थ्यांना देण्यात आल्या. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची गती वाढवण्यात आलेली आहे. यात ४७ इमारतींमध्ये ६ हजार ४५२ सदनिका असतील. अल्प, मध्यम व उच्च गटातील नागरिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. या सदनिकांबरोबरच ८३ व्यावसायिक गाळे बांधली जात आहेत. वन-बीएचके सदनिकेची मागणी अधिकची असल्याने तसे बांधकाम केले जात आहे. या प्रकल्पासाठी ७३० कोटी रुपये खर्च येणार आहे. २०२३ पासून या कामाला सुरुवात झाली आहे.
सेक्टर १२ मधील घरांची स्थिती -
सदनिका प्रवर्गासह - सदनिकांची संख्या
१) वन-आरके (इडब्लूएस-ए) - ३३२
२) वन-बीएचके (इडब्लूएस-बी) - ३,३२०
३) टू-बीएचके (एलआयजी-ए) - १,४५६
४) टू-बीएचके (एलआयजी-ए) - १,३४४
तक्रारींनंतर त्रुटी दूर
सेक्टर १२ येथील काही सदनिकांबाबत नागरिकांकडून त्रुटी सांगितल्या जात होत्या. त्यावर पाहणी समितीने त्रुटी निश्चित केल्या आहेत. त्या दूर करण्याच्या सूचना आयुक्त योगेश म्हसे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सेक्टर १२ येथील ४७ इमारतींमधील सहा हजार ४५२ सदनिकांचे काम पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आले आहे. जुलै २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. काही तांत्रिक अडचण आल्यास मुदत पुढे जाईल. त्यानंतर नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील.
- संजय पाटील, कार्यकारी अभियंता अभियांत्रिकी विभाग, ‘पीएमआरडीए’
फोटो : PNE25V09711
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.