पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

वेश्या व्यवसायप्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी : परदेशी महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिलेवर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई जुन्या सांगवीतील राधानगर येथील प्रज्ञा इमारतीत करण्यात आली. या आरोपी महिलेने एका परदेशी महिलेस पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवली. आरोपी महिलेकडून सात हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना मोशी टोलनाका रस्त्यावर घडली. सुभाष शंभूनाथ रॉय (रा. साने चौक, चिखली) असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गाने त्यांच्या दुचाकीवरून जात होते. दरम्यान, मोशी टोलनाका येथे एका भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay India : मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Akola: दारु दुकानाला NOC देण्यासाठी मागितले १ लाख, तडजोडीनंतर ६० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह लिपीकाला अटक

पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Wardha News: बदलीसाठी २० हजारांची मागणी; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT