पिंपरी-चिंचवड

गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या तिघा नेपाळींना अटक

CD

पिंपरी, ता. २६ : कॉफीमधून अथवा इतर पेयातून गुंगीचे औषध देऊन घरफोडी करणाऱ्या तीन नेपाळी आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
कमल बहादूर नयारण शाही (रा. कमल बाजार, जि. अच्छाम, नेपाळ), नवीन बहादूर रुद्र बहादूर शाही (वय २४ वर्ष, रा. दैलेख, जि. दैलेख, नेपाळ), नर बहादूर दीप बहादूर शाही (वय ३८ वर्ष, रा. कृष्णनगर, जि. कैलाली, नेपाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी, प्राधिकरण येथे एका फ्लॅटमध्ये घरकाम करणाऱ्या एका अनामिका नावाच्या नेपाळी महिलेने त्या घरातील दोघांना कॉफीमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर घराबाहेर उभ्या असलेल्या इतर साथीदारांना घरात बोलावून त्यांच्या मदतीने घरातील तिजोरी फोडून १६ लाख वीस हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्यातील कमल शाही याला पाच दिवसांनी हिंजवडी येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात इतर चार आरोपींची नावे निष्पन्न झाली. परंतु, हे आरोपी गुन्हा केल्यानंतर नेपाळ देशात निघून गेल्याचे समोर आले. मात्र, हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी बंगळूर येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाल्याने एका पथकाने बंगळूर येथे जाऊन तपास केला असता यातील दोन प्रमुख आरोपी बंगळूर परिसरात आल्याचे व ते विमानाने नेपाळ येथे परत जाण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे एक पथक बंगळूर येथे पाठवून स्थानिक पोलिस व एअरपोर्टवरील सीआयएसएफ स्टाफच्या मदतीने आरोपी नवीन शाही व नर बहादूर शाही यांना पोलिसांनी अटक केली.
या आरोपींकडून या गुन्ह्यातील चार लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, इतर दागिने हे त्यांच्या साथीदारांनी नेपाळ देशात विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून निगडीतील एक, बंगळूर येथील दोन व केरळमधील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

श्रीमंत लोकांच्या घरी जोडपे कामाला लावायचे
हे आरोपी त्यांच्या साथीदारांसह भारतात आल्यानंतर मोठया शहरांमध्ये जाऊन त्याठिकाणी श्रीमंत लोकांकडे त्यातील एक जोडपे कामाला लावतात. त्यानंतर घरमालकांचा विश्वास संपादन करताच संधी साधून इतर साथीदारांना बोलावून घरमालकांना जेवणातून अथवा पेयातून गुंगीचे औषध देऊन चोरी किंवा घरमालक गावी गेले असल्यास घरफोडीचे गुन्हे करतात. त्यानंतर तत्काळ नेपाळला निघून जातात. त्यानंतर काही दिवसांनी भारतात परत येऊन वेगळ्या शहरात अशाच प्रकारे गुन्हे करतात.


आरोपींचा विमानाने प्रवास
या गुन्ह्यातील आरोपी विमानाने प्रवास करतात. गुन्हा नेल्यानंतर पुन्हा नेपाळला जाण्यासाठी आरोपी विमानाने प्रवास करीत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आता त्याचे हातच बांधावे लागतील!" शुभमन गिल IPL 2026 Final आधी कोणाबद्दल असं बोलला?

Maharashtra Security Force: बेलगावच्या शेतकरी पुत्र शुभम मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी

SCROLL FOR NEXT