पिंपरी-चिंचवड

पोलिसांनी बनवलीय गुंडांची कुंडली

CD

पिंपरी, ता. २७ : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. सराईत गुन्हेगार, तडीपार आरोपी व समाजकंटकांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदारांवर दबाव येऊ नये तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी १ हजार ८५३ गुंडांची ‘कुंडली’ तयार केली आहे, तसेच मोठ्या प्रमाणात कारवाईवर भर दिला आहे.
शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मागील पाच ते दहा वर्षांतील गुन्हेगारी नोंदी तपासण्यात येत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी वसुली, गंभीर मारहाण, अवैध शस्त्रसाठा तसेच संघटित गुन्हेगारीशी संबंधित व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. यादीतील गुंडांवर तडीपार, स्थानबद्ध, बॉण्ड घेणे अशा प्रकारची कारवाई केली जात आहे.
निवडणुकीच्या काळात मतदारांवर दबाव आणणे, उमेदवारांच्या प्रचारात अडथळे निर्माण करणे, मतदान केंद्रांवर गोंधळ घालणे किंवा बोगस मतदानाचा प्रयत्न करणे अशा प्रकारांचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला गती दिली आहे. संशयित गुंडांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात येत असून, काही गुन्हेगारांना निवडणूक कालावधीत शहराच्या हद्दीबाहेर ठेवण्याचा निर्णयही झाला आहे.
संवेदनशील प्रभाग, मागील निवडणुकांत वादग्रस्त ठरलेली मतदान केंद्रे तसेच दंगलप्रवण भागांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तेथे अतिरिक्त बंदोबस्त, शीघ्र प्रतिसाद पथके, दंगल नियंत्रण पथके तसेच सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात आली असून, नाकाबंदी व वाहन तपासणी मोहिमाही तीव्र करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी शहरात १८ ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत.
----------
सायबर पथकाचीही नजर
पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ व शस्त्रास्त्र विषयक हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियावरून अफवा, चिथावणीखोर संदेश किंवा द्वेष पसरवणाऱ्यांवरही सायबर पथकाद्वारे करडी नजर ठेवली जात आहे.
-----------------
जून ते डिसेंबरमधील प्रतिबंधात्मक कारवाई
शांतता राखण्यासाठी बॉण्ड भरून घेणे - ६२०७
या अगोदरच्या निवडणुकीत गोंधळ घालणाऱ्यांना हद्दीबाहेर पाठवणे - ६५
तडीपार - २२९
स्थानबद्ध - १९
मकोका - २८
---------------------
‘त्या’ २६० जणांवर करडी नजर
या अगोदरच्या निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रहसन निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा २६० जणांचीही यादी तयार केली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासह हद्दीबाहेर
पाठविण्यात येत आहे.
---------------------
स्थानिक बंदोबस्त
पोलिस आयुक्त - १
पोलिस सहआयुक्त - १
अपर पोलिस आयुक्त- २
पोलिस उपायुक्त - ८
सहायक आयुक्त- १२
पोलिस निरीक्षक - ६२
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक- १८८
अंमलदार २४४९
-----------------------

बाहेरचा बंदोबस्त
अंमलदार - १७००
होमगार्ड - २०००

केंद्रीय व राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या
----------------


आगामी निवडणूक भयमुक्त वातावरणात शांततेत पार पडावी. कायदा- सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. आतापर्यंत मोठ्याप्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यापुढे आणखी कारवाया केल्या जाणार आहेत.
- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड
---------------------------------------

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Latest Marathi News Live Update: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी वन आणि खाण विभागाची आढावा बैठक घेतली

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT