पिंपरी, ता. २८ : कोरेगाव भीमाजवळील पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त शहर व परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हा बदल ३१ डिसेंबर (बुधवार) सकाळी दहा ते १ जानेवारी (गुरुवार) रात्री बारा या वेळेसाठी असेल.
बंद असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग
- चाकण ते शिक्रापूर या मार्गावर केवळ अनुयायांच्या बसेसना प्रवेश दिला जाणार असून इतर सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेश बंद
- चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक, पांजरपोळ चौक येथून आळंदी बाजूकडे ये-जा करण्यास सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेश बंद
- मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ- एचपी चौक महाळुंगे- वासोली फाटा किंवा वाघजाईमार्गे बिरदवडी गाव - खेड- नारायणगाव आळेफाटा मार्गे जातील.
- मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणारी हलकी वाहने वडगाव मावळ येथून तळेगाव-चाकण रस्त्याने चाकण चौक- पाबळ-शिरूरमार्गे जातील.
- आळंदी, कोयाळी मार्गे रसिका हॉटेल चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना शिक्रापूर दिशेने जाण्यास बंदी असेल. ही वाहने चाकण मार्गे इच्छितस्थळी जातील.
- मुंबईकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने सेंट्रल चौक देहूरोड मार्गे पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या जड वाहनांना मनाई असून ही वाहने सेंट्रल चौकातून मुंबई -बंगळुरू मार्गाने सरळ वाकडनाका मार्गे जातील.
- मुंबईकडून द्रुतगती मार्गाने पुणे बाजूकडे जाणाऱ्या जड वाहनांना उर्से टोलनाका येथून मुंबई- बंगळुरू मार्गाने मुकाई चौक सेंट्रल चौक मार्गे पिंपरी चिंचवड बाजूकडे जाण्यास मनाई असून ही वाहने वाकड नाका व राधा चौक जातील.
- चाकण, म्हाळुंगे, मरकळ, तळेगाव या एमआयडीसी मधील जड अवजड वाहनांना या कालावधीमध्ये अनुयायांच्या मार्गावर येण्यास मनाई असेल.
- आळंदी- मरकळ -लोणीकंदकडे जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने अलंकापुरम चौक (तापकीर चौक) डावीकडे वळून गोडावून चौक मार्गे तसेच च-होलीफाटा देहूफाटा येथून डावीकडे वळून नाशिक महामार्गाने जातील. यासह चऱ्होली फाटा देहूफाटा चाकण चौक माजगाव एमआयडीसी मार्गही जाता येईल. - मरकळ एमआयडीसी, सोळु, धानोरे, कडून येणारी वाहने मरकळ गाव येथून डावीकडे वळून कोयाळी मार्गे रसिका हॉटेल चौकातून चाकण येथून जातील.
* अनुयायांच्या वाहनांसाठी मार्ग
- नाशिककडून येणाऱ्या बसेस चाकणमार्गे शिक्रापूर पार्किंगकडे जातील
- मुंबईकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणाऱ्या बसेस वडगाव फाटा - म्हाळुंगे-चाकण मार्गे शिक्रापूर पार्किंगकडे जातील
- जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणारी अनुयायांची हलकी वाहने वडगाव फाटा-म्हाळुंगे-चाकण चौक-डावीकडे वळून आळंदी फाटा/भारतमाता चौक/मोशी चौक आळंदी मरकळ तुळापूर मार्गे लोणीकंद पार्किंगकडे जातील
- मुंबईकडून द्रुतगती मार्गाने येणारी हलकी वाहने उर्से टोलनाका येथून डावीकडे वळुन वडगाव फाटा- म्हाळुंगे-चाकण चौक आळंदी फाटा/भारतमाता चौक मोशी चौक मार्गे आळंदी मरकळ तुळापूरमार्गे लोणीकंद पार्किंगकडे जातील
- मुंबईकडून द्रुतगती मार्गाने येणारी हलकी वाहने मुकाई चौक मार्गे सेंट्रल चौक-नाशिक फाटा मार्गे पार्किंग ठिकाणी जातील
- नाशिककडून नाशिक-पुणे महामार्गाने येणारी अनुयायांची हलकी वाहने चाकण चौकातून डावीकडे न वळता सरळ पुढे जाऊन आळंदी फाटा किंवा भारत माता चौक किंवा मोशी चौक, पांजरपोळ चौक या ठिकाणावरुन डावीकडे वळून आळंदी मरकळ मार्गे तुळापूर वरून पुढे लोणीकंद येथे पार्किंगच्या ठिकाणी जातील. (मरकळ गाव, इंद्रायणी नदी पुलावर ८ फूट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेड लावले असल्याने जास्त उंचीची वाहने तेथून जाऊ शकणार नाहीत, त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)
- पुणे शहरातून विश्रांतवाडी चौक तसेच आळंदी फाटा या ठिकाणावरुन आळंदीच्या दिशेने अनुयायांची वाहने जाऊ शकणार नाहीत. ही वाहने वाघोली मार्गे लोणीकंदकडे पार्किंगच्या दिशेने जातील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.