पिंपरी-चिंचवड

फुलांचे भाव कोसळल्याने शेतकरीवर्ग पुन्हा अडचणीत

CD

सोमाटणे, ता. ३० ः फुलांचे बाजारातील भाव कोसळल्याने शेतकरीवर्ग पुन्हा अडचणीत सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीने पवनमावळ पूर्व भागातील गहुंजे, सांगवडे, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, कुसगाव, पाचाणे, चांदखेड परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या फुलशेतीचे नुकसान झाले होते.
सततच्या पावसाने फुले भिजत राहून खराब झाली होती. पाऊस उघडल्यानंतर पावसाच्या माऱ्यातून जे तरले त्यांना चांगले बाजारभाव मिळाले होते. त्यातच लग्नसराई, निवडणुका यामुळे फुलांना मागणी वाढून भाव अचानक वाढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळत होता, परंतु ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. सध्या भाव कोसळले असून झेंडूचा बाजारातील भाव किलोला तीस ते चाळीस रुपयांवर आला आहे. शेवंती व अस्टर ५० ते ७० रुपये, तर गुलछेडीचाही भाव निम्यावर आला आहे. फुलांचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या नफा होण्याच्या आशा मावळल्या आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड फूल मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजुकुमार बोडके यांनी दिली.
----------------------------------------------------
फोटो आयडी
80693

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT