पिंपरी-चिंचवड

आम आदमी पक्ष ३५ जागा लढवणार

CD

पिंपरी, ता. २९ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) प्रथमच प्रवेश केला असून विविध प्रभागांतून एकूण ३५ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे शहरातील राजकारणात नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः प्रमुख पक्षांकडून डावलले गेलेले इच्छुक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार यांच्यासाठी आप हा एक विश्वासार्ह पर्याय ठरत असल्याचे चित्र आहे. सुरवातीला सर्वच प्रभागांतील प्रमुख जागा लढविण्याची रणनीती आखण्यात आली होती. मात्र, परिस्थितीचा आढावा घेत काही महत्त्वाच्या आणि निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यानुसार पक्षाने ३५ जागा लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सांगण्यात आली.
--------

दिग्गज नेत्यांच्या सभा होणार
आपचा प्रचार करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यसभा खासदार संजय सिंह आणि गुजरातमधील प्रमुख नेते गोपाल इटालिया यांची शहरात प्रचारसभा होणार आहेत. या सभांच्या माध्यमातून पक्षाचे स्थानिक उमेदवार, पक्षाची धोरणे आणि महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा अजेंडा थेट मतदारांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. या प्रचारसभांना विविध प्रभागांतून नागरिकांची मोठी उपस्थिती राहण्याची शक्यता असून, स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचा संदेश दिला जाणार असल्याचे आपच्या वतीने सांगण्यात आले.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Beed Heavy Dust Creating Problems for Commuters: गेवराई–जातेगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वर्षभरापासून रुंदीकरणाचे काम रखडले

Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

मोठी बातमी! बारावीचे प्रवेश यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; खासगी शाळांना आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत

SCROLL FOR NEXT