पिंपरी-चिंचवड

पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनाही अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण

CD

पिंपरी, ता. ३० : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून तब्बल एक हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अग्निसुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे विजयस्तंभ परिसरात तैनात पोलिस कर्मचारी देखील आता अग्निशमनाच्या प्राथमिक कार्यासाठी सज्ज झाले आहेत.
कोरेगाव भीमा येथे गुरुवारी (ता.१) विजयस्तंभ अभिवादन सोहळा होत असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून व्यापक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तेथील बंदोबस्ताचा सविस्तर आढावा नुकताच पुणे पोलिस आयुक्तालयामार्फत घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ सामोरे जाण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाने पुणे शहर पोलिस आयुक्तालयात आयोजित बैठकीत तब्बल एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेचे विशेष प्रशिक्षण दिले.
पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने प्राथमिक स्वरूपाच्या आगी, त्यावरील तातडीच्या उपाययोजना तसेच अग्निशमन उपकरणांचा योग्य वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आल्याने आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेणे पोलिसांना अधिक सुलभ होणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी आग लागल्यास ती कशी नियंत्रणात आणावी आणि ‘गोल्डन अवर’मध्ये कोणती कार्यवाही आवश्यक आहे, यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला. पीएमआरडीएच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी आगीचे प्रकार ओळखणे आणि त्यानुसार योग्य उपकरणांची निवड व वापर याचे प्रात्यक्षिक दिले.


मोठ्या जनसमुदायाच्या सुरक्षिततेला पोलिस व प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पोलिस दल आणि अग्निशमन विभाग यांच्यातील समन्वयामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद व प्रभावी प्रतिसाद देणे शक्य होईल.
- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT