पिंपरी-चिंचवड

महापालिकेत नव्या वर्षात, नवे कारभारी

CD

पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे रखडली होती. आता ती होऊ घातली आहे. त्यासाठी मंगळवारी (ता.३०) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्थात शुक्रवारी (ता. २ जानेवारी) रोजी लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून, १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात नवे कारभारी महापालिकेला मिळणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवार (ता. ३०) होता. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांमधील अनेक घडामोडी शेवटच्या क्षणी घडल्या. त्यामुळे सध्यातरी शहरातील राजकीय चित्र अस्पष्ट आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्थापना झाली. आता दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र; तर शिवसेना स्वतंत्र लढत आहे. शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- राष्ट्रीय समाज पक्ष यांनी स्वतंत्र आघाडी केली आहे.
वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष यांच्यासह अन्य पक्षांसह अपक्षही निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज छाननी व माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. मात्र, मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार, त्यावरच पुढील कारभारी ठरणार आहेत. हे १६ जानेवारी रोजी मतमोजणीनंतरच समजणार आहे. एकंदरीत गेल्या चार वर्षांपासून आयुक्त पहात असलेले प्रशासकीय कामकाज संपुष्टात येऊन महापालिकेला स्वतंत्र कारभारी मिळणार आहेत.

२०१७ च्या निवडणुकीचे चित्र
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १२८ पैकी ७७ जागा जिंकून सत्ता स्थापन केली. तर, ३६ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीने काम पाहिले. त्या निवडणुकीत शिवसेनेला नऊ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक आणि अपक्षांना पाच जागांवर विजय मिळाला होता. १३ मार्च २०२२ रोजी या पदाधिकाऱ्यांची मुदत संपली.

...म्हणून रखडली निवडणूक
कोविड प्रतिबंधक नियमावली, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाचे न्यायप्रविष्ट प्रकरण आणि राज्यातील बदलती समीकरणे या कारणांमुळे निवडणूक होऊ शकली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

मतदारांना पडलेले प्रश्न
- महापालिकेत भाजप सत्ता राखणार का?
- २०१७ पूर्वी १५ वर्षे ताब्यात असलेली महापालिका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने पुन्हा मिळवणार का?
- निकालनंतर नवीनच समीकरणे सभागृहात दिसणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अपघात; गरम वाफेच्या झळीत चार कर्मचारी भाजले

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT