पिंपरी-चिंचवड

‘मसाप’ची पिंपरी चिंचवड शाखा करणार कविकट्टाचे प्रतिनिधित्व

CD

पिंपरी, ता. ३० ः सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा या लोकप्रिय व्यासपीठाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा करणार आहे. शाखेचे अध्यक्ष राजन लाखे प्रमुख असतील. त्यामुळे साहित्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराचे महत्त्व अखिल भारतीय पातळीवर अधोरेखित झाले आहे आणि पिंपरी चिंचवड साहित्य क्षेत्रासाठी ही मानाची बाब मानली जात आहे.
गुरुवारी (ता. १) सायंकाळी ४ वाजता कविकट्टयाचे उद्‍घाटन ज्येष्ठ उद्योगपती भालचंद्र जोशी यांच्या हस्ते होईल. यावेळी रवींद्र बेडकीहाळ, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तसेच संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
या कविकट्ट्यासाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त बृहन्महाराष्ट्रातील बंगळूर, हैदराबाद, गोवा, दमण , दिल्ली, बडोदा, अहमदाबाद, इंदूर येथून ७२ कविता, तर जपान आणि अबुधाबी येथून प्रत्येकी एक कविता आली आहे. महाराष्ट्र तसेच बृहन्महाराष्ट्रातून कवितांचा पाऊस पडला आहे. प्राप्त झालेल्या एकूण १७६२ कवितांमधून निवड झालेल्या ४५० कवींना आपली कविता कविकट्टयावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. हे संमेलन चार दिवसांचे असून कविकट्टा एकूण २२ तास चालणार आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT