शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडी
अनेकांनी केले पक्षांतर
पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच सर्वच पक्षांमध्ये चुरस असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरायच्या व एबी फॉर्म द्यायच्या शेवटच्या क्षणापर्यंत आज मंगळवारी (ता. ३०) अनेक राजकीय घडामोडी घडल्या अनेकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत उमेदवारी दाखल केली.
राजकीय क्षणचित्रे
- वाल्हेकरवाडी-चिंचवडेनगर प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपचे शेखर चिंचवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व भाजपच्या सचिन चिंचवडे यांच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला. शेखर चिंचवडे यांच्या पत्नी करुणा चिंचवडे २०१७ मध्ये भाजपकडून याच प्रभागात निवडून आल्या होत्या.
- संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी भोंडवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांच्या पत्नी आशा भोंडवे यांनी उमेदवारी अर्ज भरला.
- प्राधिकरण-निगडी प्रभाग क्रमांक १५ मध्ये मागील वेळी दुसऱ्या क्रमांकावर असणारे भाजपचे उमेदवार, माजी नगरसेवक धनंजय काळभोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी दाखल केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या माजी उपमहापौर राजू मिसाळ यांच्या विरोधात जोरदार लढत होणार आहे.
- केशवनगर-चिंचवडगाव प्रभाग क्रमांक १८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर अपर्णा डोके यांनी ऐनवेळी आज भाजपमध्ये प्रवेश केला व एबी फॉर्मसह अर्ज भरला. काल सोमवारी (ता. २९) त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरला होता.
- आकुर्डी-मोहननगर प्रभाग क्रमांक १४ मधून सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आज ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवार अर्ज दाखल केला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.