पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज वितरणाचा मंगळवारी (ता. ३०) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत विहित वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण ३७० नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले. महापालिकेच्या १२८ जागांसाठी ५ हजार ९८१ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १०, १४, १५, १९ साठी अनुक्रमे १५, ७, ७ व २७ असे एकूण ५६ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
‘ब’ मधून प्रभाग क्रमांक १६, १७, १८, २२ साठी अनुक्रमे ११, १७, १८ व २२ असे एकूण ६८ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रभाग क्रमांक २, ६, ८, ९ साठी अनुक्रमे ३, ६, १४ व ६ असे एकूण २९ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २५, २६, २८, २९ साठी अनुक्रमे ७, २, २ व ११ असे एकूण २२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ७ साठी अनुक्रमे १६ ६,१ व ७ असे एकूण ३० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. ‘फ’ मधून प्रभाग क्रमांक १, ११, १२, १३ साठी अनुक्रमे १३, ६, ० व २२ असे एकूण ४१ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. ‘ग’ मधून प्रभाग क्रमांक २१, २३, २४, २७ साठी अनुक्रमे १६, १७, ८ व १० असे एकूण ५१ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. ‘ह’ म्हणून २०, ३०, ३१, ३२ साठी अनुक्रमे ८, २८, ३१ व ६ असे एकूण ७३ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
----