पिंपरी-चिंचवड

मतदान जनजागृतीसाठी विविध ठिकाणी कार्यक्रम

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ ः महापालिकेच्यावतीने मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्याकरिता विविध ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये मतदार स्लीप वाटप, मतदार प्रतिज्ञा घेणे, पथनाट्ये, लोकशाही विषयक रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा राबवून तसेच मतदान माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात येत आहे.
इंद्रायणी वृद्धाश्रम व विकास अनाथ आश्रम येथे महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयामार्फत १५ जानेवारी रोजी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी ‘चला मतदान करु या’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवडणूक पर्यवेक्षक अमोल फुंदे, स्वीप अधिकारी पांडुरंग घुगे, दिनेश जगताप, स्वीप सहायक रवींद्र बोरकर, गव्हाणे धनंजय, सारिका गहाळ आणि दीपाली बिरारे यांच्यासह वृद्धाश्रम प्रमुख माऊली हरकळ उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: होळी, मोहरम आणि गांधीजयंती दिनी दारूची दुकाने उघडण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय, उत्पादन शुल्क धोरणात बदल

'सैराट'मधून किती पैसे मिळाले? रिंकूने असं काय म्हटलं की होतेय ट्रोल? वाचून तूम्हीही म्हणाल- काहीही हा श्री

Igatpuri News : सावधान! तुम्ही खात असलेली कुल्फी 'विष' तर नाही? इगतपुरीत बनावट कुल्फी कारखान्याचा पर्दाफाश

Ramadan Moon Sighting Rules : इस्लाममध्ये रमजान पवित्र का मानला जातो? 'या' पाच स्तंभांना का आहे महत्त्व?

Gas and Headache: गॅस डोक्यात जातो का? ‘या’ 4 लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT