पिंपरी-चिंचवड

बंडखोरी टाळण्यासाठीची खेळी अंगलट

CD

पिंपरी, ता. ३१ : महापालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्थात मंगळवारी (ता.३०) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली नव्हती. थेट ए-बी फॉर्म वाटप करून अर्ज दाखल केले. शिवाय, दोन्ही पक्षांनी बुधवारी (ता.३१) अर्ज छाननीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंतही यादी प्रसिद्ध करण्याचे टाळले. त्यामुळे नक्की उमेदवारी कोणाला दिली, याबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम होता. अर्जांच्या छाननीमुळे अधिकृत उमेदवार कोण? याचे चित्र स्पष्ट झाले.

राज्य व केंद्र सरकारमध्ये महायुती म्हणून एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक स्वतंत्र लढत आहेत. भाजपने केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोबत घेऊन पाच जागा त्यांना दिल्या, तर १२३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र, एका जागेसाठी तीन-तीन, चार-चार अर्ज दाखल झाले आहेत. त्यांतील अधिकृत उमेदवारी नक्की कोणाला (ए-बी फॉर्म) याबाबत मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत कोणाला कळू दिले नाही. दुसरा मित्रपक्ष शिवसेनेसोबतची युती दोन जागांवर समझोता न झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या अवघे काही मिनिटे अगोदर तुटली. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्रपणे ७० जागांवर उमेदवार उभे केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी केली. राष्ट्रवादीने ११० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १८ जागा दिल्या होत्या. मात्र, त्यांनी केवळ १४ जागांवरच उमेदवार दिले आहेत. त्यामुळे चार जागांवर दोन्ही राष्ट्रवादींपैकी कोणाचेही उमेदवार नाहीत. शिवाय, पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. मात्र, दोन्हीही पक्षांनी मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत यादी जाहीर केली नव्हती.

सहा प्रभागांत काँग्रेसचे उमेदवारच नाहीत
- महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकीसाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत काँग्रेसने ५८ जणांना उमेदवारी दिली आहे.
- २०१७ च्या निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आलेले नसल्याने काँग्रेसच्या यादीत माजी नगरसेवकांचा समावेश नाही. जवळपास सर्वच नवीन चेहरे आहेत.
- प्रभाग २, ९, १२, १६ व ३० मध्ये सहा मुस्लीम समाजातील उमेदवार दिले आहेत
- चार उमेदवार असलेले प्रभाग : ९, ११, १६, १७
- तीन उमेदवार असलेले प्रभाग : ८, १२, १३, १५, १९, २०, २२, २५, ३०
- प्रत्येकी दोन उमेदवार असलेले प्रभाग : १०, २३
- एका जागेवरी उमेदवार असलेले प्रभाग : १, २, ३, ४, ५, ६, १४, १८, २८, ३१, ३२
- एकही उमेदवार नसलेले प्रभाग : ७, २१, २४, २६, २७, २९

शिवसेना (ठाकरे)- मनसे युती
- शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाली आहे. त्यांनी अनुक्रमे ५९ व १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत
- प्रभाग ४, ७, १५, २४, ३१ मध्ये दोन्ही पक्षांकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नाही
- प्रभाग ९ मधील ‘ड’ जागा, प्रभाग १३ मधील ‘अ’ व ‘ड’ जागा, प्रभाग १४ मधील ‘क’ जागा, प्रभाग १९ मधील ‘अ’ जागा, प्रभाग ३० मधील ‘क’ जागा येथे दोन्ही पक्षांनी उमेदवारी दिल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे
- प्रभाग ११, ३० मध्ये शिवसेनेने (उबाठा) चारही जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र, प्रभाग ३० मधील क जागेवर दोघांचेही उमेदवार आहेत. या जागेवर काँग्रेसच्या माजी नगरसेविका (२०१२ ची निवडणूक) सुषमा गावडे शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार आहेत
- दोन्ही पक्षांनी मिळून केवळ प्रभाग १०, १३ व ३० मध्येच चारही जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र, प्रभाग १३ मधील ‘अ’ व ‘ड’ जागा आणि प्रभाग ३० मधील ‘क’ जागेवर दोघांचेही उमेदवार असल्याने प्रत्येकी एका उमेदवाराला माघार घ्यावी लागेल किंवा मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागेल
- शिवसेनेच्या यादीत एकही माजी नगरसेवक नाही, मात्र, प्रभाग १३ मधील ‘ड’ जागेवर मनसेचे माजी नगरसेवक सचिन चिखले आणि ‘क’ जागेवर २०१२ च्या पंचवार्षिक मधील मनसेच्या माजी नगरसेविका अश्विनी चिखले उमेदवार आहेत. ‘ड’ जागेवर चिखले यांच्यासह शिवसेनेचे (ठाकरे) सतीश मरळ उमेदवार आहेत.
- मनसेने प्रभाग १३ मधील ‘अ’ जागेवर २०१२ च्या पंचवार्षिक मधील माजी नगरसेवक शशिकिरण गवळी यांना उमेदवारी दिली आहे. याच जागेसाठी शिवसनेने (ठाकरे) रवींद्र खिलारे यांना उमेदवारी दिली आहे.
- प्रभाग १३ मधील ‘अ’ व ‘ड’ जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार असल्याने एकाला माघार घ्यावी लागणार किंवा मैत्रिपूर्ण लढत द्यावी लागणार आहे.

आम आदमी पक्षाचे ३५ उमेदवार
- आम आदमी पक्ष (आप) महापालिका निवडणूक पहिल्यांदाच लढत आहे. त्यांनी १२८ पैकी ३५ जागांवर उमेदवार दिले आहेत.
- प्रभाग २, ७, ८, १८, २५ मध्ये प्रत्येकी केवळ एकच उमेदवार दिला आहे.
- प्रभाग १, ३, ४, ५, ९, ११, १३, २१, २३, २४, २७, २८, २९, ३१, ३२ मध्ये एकही उमेदवार दिलेला नाही.
- प्रभाग १५ मधील ‘ब’ व ‘ड’ या अनुक्रमे महिलांसाठी राखीव व सर्वसाधारण जागांवर प्रत्येकी दोन उमेदवार दिले आहेत, त्यातील प्रत्येकी एकाला माघार घ्यावी लागणार आहे
- प्रभाग ६, १२, १४, १६, १७, १९, २०, २६ मध्ये प्रत्येकी दोन उमेदवार आहेत
- प्रभाग २२ व ३० मध्ये प्रत्येकी तीन उमेदवार असून कोणत्याही प्रभागात चारही जागांवर उमेदवार नाहीत.

भाजपकडून १७ नवख्यांना उमेदवारी
- महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपने शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील २५ पेक्षा अधिक जणांना प्रवेश दिला होता. त्यापैकी १७ माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे
- भाजपने उमेदवारी दिलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले शरद उर्फ राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, उषा वाघेरे, शकुंतला धराडे, अपर्णा डोके, प्रसाद शेट्टी, समीर मासुळकर, प्रवीण भालेकर, अनुराधा गोफणे, आशा सूर्यवंशी, संजय काटे; शिवसेनेतून आलेले रवी लांडगे (२०१७ ला भाजपचे नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले, नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले), अमित गावडे, मीनल यादव; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आलेले राहुल कलाटे (२०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून विजयी, नंतर ‘राष्ट्रवादी’कडून चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवलेले; काँग्रेसमधून आलेले सद्‍गुरू कदम आदींचा समावेश आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका मंगला कदम यांचे चिरंजीव कुशाग्र कदम यांनाही उमेदवारी दिली आहे.
- भाजपने सोडलेल्या पाच जागांवर रिपाइंने (आठवले) उमेदवार उभे केले आहेत. मात्र, पक्षाला स्वतंत्र चिन्ह नसल्याने आणि जागांचा तोटा होऊ नये, यासाठी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli breaks Viv Richards' record : विराट कोहलीने २०२५च्या शेवटच्या दिवशी मोडला विव्ह रिचर्ड्स यांचाही विक्रम!

Sankalp Kalkotwar : शिक्षक वडिलांनी दिलं पंखात बळ, आता नागपूरच्या मैदानात चमकतोय अहेरीचा खेळाडू

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

SCROLL FOR NEXT