पिंपरी, ता. ६ ः ‘प्रशासकीय यंत्रणांनी शोषित, वंचितांच्या उत्थानासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची बैठक झाली. यावेळी महापालिकेतील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या, दलित वस्ती रमाई घरकुल वस्ती योजनेचा आढावा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र व अपात्र नागरिकांच्या गैरसोयी अशा विविध विषयांचा त्यांनी आढावा घेतला.
झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, ममता शिंदे, महापालिका कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज माछरे, जिल्हा दक्षता समिती सदस्य ॲड. सागर चरण, कर्मचारी महासंघाचे अभिषेक फुगे, सनी कदम, संजय वाघमारे, कामगार नेते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, संजय जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत नागरिक व अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त सूचना व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचा आदेश ॲड. लोखंडे यांनी प्रशासनाला दिला.
ॲड. लोखंडे म्हणाले, ‘‘लाड-पागे आणि अनुकंपा वारस नियुक्तीचे प्रकरण प्रलंबित ठेवू नका. अडचणी असल्यास संबंधितांना तत्काळ कल्पना देऊन मार्गदर्शन करा. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना कोणतीही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याकडे लक्ष द्या. एसआरएबाबत तक्रारींची दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाबाबत शासनाचा निर्णय आहे. शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा.’’
---
प्राप्त सूचना आणि निवेदने
- रमाई स्मारकाच्या पिंपरीतील जागेचे आरक्षण
- लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी
- अनुकंपा वारस नियुक्ती
- मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विहित वेळेत पदोन्नती
- सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न
- झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना उपाययोजना
- प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन
- मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्प
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.