पिंपरी, ता. ६ ः महापालिकेच्या भोसरी इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी डीजिटल मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. संदीप वाघमोरे यांनी विकसित केलेल्या डीजिटल पद्धतीचा वापर केला.
मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी आणि शिक्षकांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक व पेपरलेस पद्धतीने संपूर्ण मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच राबवली. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि देशातील निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली जाते, याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी उपक्रम राबवला. यामध्ये निवडणूक अर्ज भरण्यापासून, मतपत्रिका तयार करणे, विद्यार्थ्यांना विविध चिन्हांचे वाटप करणे, निवडणुकीचा प्रचार करणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे, अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. विद्यार्थ्यांनी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी अशा विविध महत्त्वपूर्ण भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडल्या. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि त्याचे बारकावे प्रत्यक्ष अनुभवता येत आहेत.
मतदार ३०० विद्यार्थी
निवडणुकीत पाचवी ते सातवीतील ३७९ पैकी ३०० विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. वैभव कोपरे आणि नाजियाखातून अन्सारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. मतदान प्रक्रिया डीजिटल निकालही त्वरित जाहीर केला. यामध्ये शुभम दयानंद आवटे १४६ मतांनी विजयी होऊन शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवडून आला. यांच्यासह एकूण १० उमेदवार निवडून आले.
शाळेतील निवडणूक हा केवळ शैक्षणिक उपक्रम नसून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रिया शिकवणारी एक जिवंत प्रयोगशाळा आहे. अशा उपक्रमांमधून उद्याचे सजग, जबाबदार आणि सशक्त नागरिक घडतील. यापुढे सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतील.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
भोसरीतील वैष्णोमाता शाळेने विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात राबवलेली डीजिटल निवडणूक ही निश्चितच कौतुकास्पद आहे. ही निवडणूक केवळ एका शालेय प्रक्रियेपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती विद्यार्थ्यांसाठी लोकशाही शिक्षणाचा एक जिवंत अनुभव ठरणार आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
आजच्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न रुजवता, त्यांना व्यवहारात लोकशाही प्रक्रियेचा थेट अनुभव देणे, ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डीजिटल आणि पर्यावरणपूरक निवडणूक राबवून लोकशाही मूल्यांच पालन केले आहे.
- किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.