पिंपरी-चिंचवड

शालेय जगत

CD

एच. ए. स्कूलमध्ये पसायदान

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत सामूहिक पसायदान सादर करण्यात आले. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचे पूजन झाले. इयत्ता पहिलीतील ज्ञानेश्वरी इथापे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या वेशभूषेत आली होती. पुष्पा राऊत यांनी मुलांना माहिती दिली. ‘गीतमंचा’तील समीक्षा इसवे, अनिता येनगुल, अनघा कडू व रत्नाकर वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पसायदान म्हणण्यात आले.

मॉडर्न स्कूलमध्ये दहीहंडी

निगडीतील यमुनानगरमधील मॉडर्न प्री प्रायमरी-प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाळगोपाळांची दहीहंडी उत्साहात झाली. मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे व शिक्षकांच्या हस्ते दहीहंडीची पूजा झाली. लीना पगारे यांनी जन्माष्टमीची कथा सांगितली. बालचमूंनी तीन ते चार थर रचून दहीहंडी जोमाने फोडली. या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्यामकांत देशमुख, यशवंत कुलकर्णी, शाळेचे व्हीजीटर अतुल फाटक आणि शशिकांत ढोले, मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांनी मार्गदर्शन केले. नमिता घोलप, ज्ञाती चौधरी यांनी संयोजन केले.

मोशी कन्या शाळेत दहीहंडी

महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्या शाळा, मोशी क्रमांक १०७ मध्ये दहीहंडी साजरी झाली. अनेक विद्यार्थिनींनी राधा आणि कृष्णासारखी वेशभूषा केली होती. मुख्याध्यापिका सुरेखा डांगे, संतोष शितोळे, अमोल भालेकर, सायली शिंदे यांनी आयोजन केले. अध्यक्ष किरण खाटपे, शिक्षक सोमनाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

सई, नैतिकचे यश

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडीतील विलू पूनावाला हायस्कूलचे आठवीतील विद्यार्थी सई सुतार व नैतिक भोईटे यांनी भारत विकास परिषदेमार्फत आयोजित ‘भारत को जानो’ स्पर्धेच्या ज्युनियर गटात तृतीय क्रमांक मिळविला. निगडीतील सावरकर भवनात झालेल्या स्पर्धेत १२ शाळांचे ५४९ विद्यार्थी सहभागी झाले. सई व नैतिकचे संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, प्राचार्या लता भोसले यांनी अभिनंदन केले. मनिषा बडदाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मॉडर्न संकुलात संस्कृत दिन

निगडीतील मॉडर्न शैक्षणिक संकुलात संस्कृत दिनाचे औचित्य साधून दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धा झाली. हेम देव थापर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा परिचय, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये केले. उपक्रमासाठी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी मार्गदर्शन केले.

कन्या विद्यालय-पोलिसांचा उपक्रम

पिंपरी वाघेरेमधील कन्या विद्यालय आणि पिंपरी पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थिनींनी अमली पदार्थविरोधी संदेश देणारी तसेच जागृतीपर चित्रे कल्पकतेने रेखाटली. मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी अमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनींनी तयार केलेली भारताच्या नकाशाची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली. चित्रकला शिक्षक युनूस शेख आणि विभाग प्रमुख स्वाती भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. पर्यवेक्षिका वैशाली मेमाणे यांनी आभार मानले.

संचेती विद्यालयात वृक्षारोपण

थेरगावमधील श्री आनंद विद्या प्रसारक मंडळ संचलित संचेती प्राथमिक विद्यालयातर्फे शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या
उपक्रमांतर्गत घोरावडेश्वर येथे वृक्षारोपण करण्यात आले. वर्षाजी टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमासाठी संचालक आदित्य टाटिया, श्रीधर गायकवाड यांनी सहकार्य केले. इयत्ता चौथीच्या ५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी मिळून आंबा, चिंच, कडुनिंब, पिंपळ, वड, जांभूळ अशी ५० देशी झाडे लावली. अनिल शिंदे, शिक्षिका पुनम खेडकर यांनी नियोजन केले.

‘हर घर तिरंगा’ फेरी

पी. सी.एम.सी. पब्लिक स्कूलच्या कै. सोपानराव विष्णू काळभोर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काळभोरनगर परिसरात ‘हर घर तिरंगा फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर घोषणा जोशात केल्या. मुख्याध्यापक एस. एन. केदार यांनी प्रास्ताविक केले. व्ही. एम. साळी, एम. आय. पठाण, एस. आर. खेडकर, एस. एन. पवार, एस. के. काटे, डी. पी. नरूटे यांनी संयोजन केले. एस. एल. मेहेर यांनी सूत्रसंचालन केले.

ऑल सेंट्समध्ये स्वातंत्र्य दीन

ऑल सेंट्स हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा झाला. यावेळी विद्यार्थी कृष्णा सांगळेचा राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेतील सुवर्णपदकाबद्दल सत्कार झाला. पोलिस अधीक्षक कैलास पिंगळे यांना ध्वजवंदनाचा मान मिळाला. मुख्याध्यापिका डॉ.जस्सी जयसिंग, बॉबी मरिअम्मा, संचालक डॉ. जयसिंग डी., डेव्हिड पिल्ले, समन्वयक श्रद्धा मतकर, ॲलन देवप्रियम यावेळी उपस्थित होते. शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती दिली.

जैन संघटना विद्यालयात दहीहंडी

भारतीय जैन संघटनेच्या प्राथमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव साजरी झाली. प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, मुख्याध्यापक संजय जाधव, पालक संघाच्या उपाध्यक्ष सुवर्णा जाधव, सहसचिव सोपान इनामदार, निर्मला मिसाळ, उज्ज्वला पिचड यांनी दहीहंडीचे पूजन केले. बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. चौथीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्रित प्रयत्न करून समानतेचा संदेश देत दहीहंडी फोडली. चौथीतील विद्यार्थ्यांनी दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे प्रदर्शन चित्ररूपात मांडले. शैला बर्वे यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांविषयी कथा सांगितल्या. दीपिका सावंत यांनी आभार मानले. सायली माने यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन अरुणा धिवार, स्नेहलता वाडेकर, अपर्णा कुमठेकर, प्रदीप बोरसे, विलास गुंजाळ, सुवर्णा जाधव, भाग्यश्री भोईर व अमोलिक सविता यांनी केले.

साईनाथ बालक मंदिरात दहीहंडी

श्री साईनाथ बालक मंदिरात दहीहंडी झाली. बाल वर्गातील वेदांगी सावंतने राधेची, तर अमेय कुलकर्णीने श्रीकृष्णाची वेशभूषा केली. शिशुवर्ग, बालवर्ग आणि खेळ गटाच्या मुलांनी टिपरी नृत्य केले. छोट्याशा मयंक सुकाळेने दहीहंडी फोडली. या सणाचे महत्त्व संस्थेच्या निशा बेलसरे यांनी सांगितले. बाल वर्गातील मुलांनीही भाषणे केली. कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक यांनी संयोजन केले. स्वाती कुलकर्णी, मानसी कुंभार, चैत्राली निबंधे, प्रज्ञा जोशी आणि योगिता देशपांडे यांनी सहकार्य केले.

मुथा कन्या प्रशालेत पुस्तक हंडी

सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत दहीहंडी व पुस्तक हंडी उत्साहात साजरी झाली. विद्यार्थिनी भार्गवी हरिदास, श्रुती घोडके व शिक्षक सचिन यादव यांनी जन्माष्टमी व दहीहंडीविषयी माहिती दिली. प्राचार्या भारती सारंगा यांनी दहीहंडीतील मनोरे व त्यातील शिस्तबद्धतेचे महत्त्व सांगितले. उपमुख्याध्यापिका सुषमा बंब व पर्यवेक्षक दीपक थोरात यांनी शुभेच्छा दिल्या.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा कहर! भिंत कोसळल्याची घटना, रहिवाशांचे स्थलांतर

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Kidney Failure Causes: किडनी फेल होण्याचं कारण बनतो UTI? 'ही' 5 लक्षणं वेळीच ओळखा आणि उपाय जाणून घ्या

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

SCROLL FOR NEXT