पिंपरी-चिंचवड

चाचणी झाली, लायसन्स मिळाले नाही?

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० ः वाहन परवाना काढण्यासाठी तुम्ही चाचणी दिली, त्यानंतर काही महिने उलटले तरी स्मार्ट कार्डरुपी लायसन्स मिळालेले नाही? ...मग चुकीचा किंवा अर्धवट पत्ता, घराला कुलूप किंवा तुम्हीच घरी नसणे अशी कारणे असू शकतात. अशाप्रकारे आठ महिन्यांत १ हजार १९१ नागरिकांची लायसन्स पोस्टाने पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) परत पाठविली आहेत.
त्यानंतर संबंधित नागरिकांना पोस्टात तसेच आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. २०२३ पासून स्मार्ट कार्डची छपाई मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे होऊ लागली. पिंपरी-चिंचवड आरटीओच्या कक्षेतील वाहन परवाने आणि आरसी बुक स्मार्ट कार्डची छपाई छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. त्यानंतर ती चिंचवड पोस्ट कार्यालयात पाठविली जातात. तेथून शहरातील विविध पोस्ट कार्यालयांत ती वितरित केली जातात.
वाहन चालक परवान्यासाठी अर्ज करताना आधार कार्डवरील पत्ता टाकतात. हाच पत्ता परवान्यावर छापला प्रिंट जातो. अर्धवट पत्ता असल्यामुळे पोस्टमनला घर शोधताना तारेवरची कसरत करावी लागते. पत्ता न मिळाल्यामुळे पोस्टमन परवाना पोस्ट कार्यालयात परत आणतो.
---------
सहा दिवस पोस्टात...
पोस्टामार्फत लायसन्स आणि आरसी बुकचे स्मार्ट कार्ड परत आल्यानंतर एक दिवस पोस्टमनकडे, त्यानंतर जवळील पोस्ट ऑफिसात सहा असे एकूण सात दिवस ठेवले जाते. या कालावधीत संबंधित ते घेऊन जावे लागते. त्यानंतर उपमुख्य कार्यालयातून महिन्याच्या आत घेऊन जावे लागते. एका महिन्यानंतर ते आरटीओकडे पुन्हा पाठवले जाते.
--------------
ऑनलाइन ट्रॅकिंगची सोय
नागरिकांना पोस्टात आलेले आरसी बुक आणि लायसन्स https://www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ते कोठे आहे ते पाहता येते. परिवहन विभागाकडून आलेल्या एसएमएसवरील नोंदणी क्रमांक टाकून ते ट्रॅक करता येते.
--------------
किती परवाने परत ?
२०२२ - ३,८०४
२०२३ - ३,५७२
२०२४ - ३,६९३
२०२५ - १,१९१
(१ जानेवारी ते १५ ऑगस्ट)
-------------
वाहनचालकांनी परवान्यासाठी अर्ज करताना जो पत्ता टाकला आहे, त्या पत्त्यावर वाहन परवाना पाठविले जातात. बहुतांश वेळा अर्धवट पत्ता असल्याने लायसन्स ते पोस्टातून आरटीओकडे परत येते. अशा वाहनचालकांसाठी आरटीओ कार्यालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT