पिंपरी, ता. २१ ः पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी आणि हिंजवडी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्क (हिंजवडी आयटी पार्क) या दोन्हींच्या केंद्रस्थानी असलेल्या हिंजवडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, मामुर्डी आणि जांबे या भागांमध्ये बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या भागातील दर्जेदार शिक्षण संस्था, आलिशान मॉल्स आणि मुंबई-बंगळूर महामार्गाची उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे या भागात प्रीमियम प्रॉपर्टीज खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
हिंजवडी आयटी पार्कमुळे आयटीयन्स मोठ्या संख्येने या परिसरात स्थायिक होण्यास उत्सुक आहेत. त्यांना कार्यालयाच्या जवळच प्रशस्त घरे मिळावीत या उद्देशाने बांधकाम व्यावसायिक विविध पर्याय उपलब्ध करून देत आहेत. केवळ घरच नाही तर वाढत्या लोकसंख्येमुळे शॉपिंग, ऑफिस स्पेस, तसेच इतर व्यावसायिक गरजांसाठी कमर्शियल प्रॉपर्टीचीही मागणी पूर्ण केली जात आहे.
पश्चिम पिंपरी-चिंचवड भागातील नव्या प्रकल्पांमध्ये आधुनिक सुविधा, क्लबहाउस, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था, ग्रीन झोन यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. शहरी जीवनशैली आणि निसर्गाचा संगम असल्याने गुंतवणुकीसाठी या भागांना पसंती मिळत आहे. घर खरेदी अथवा व्यावसायिक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी पश्चिम पिंपरी-चिंचवड परिसर हा सर्वाधिक लाभदायक पर्याय ठरत आहे. या भागातून आयटी क्षेत्रात जाण्यासाठी अगदीच दहा मिनिटांचा अवधी लागतो. रस्ते मोठे केले जात असल्यामुळे भविष्यात हिंजवडी आयटी पार्कचे अंतर आणखी कमी होणार आहे. जवळच असलेल्या दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा मैदाने, बीआरटी बस स्थानके अशा जमेच्या बाजू आहेत. अगदीच एक किलोमीटर अंतरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे या भागात घर घेणे सोयीचे ठरत आहे.
------
साई अंगणने आजपर्यंत ले आउट सँक्शन १००० ओपन प्लॉट्स विक्री केले आहेत. स्वतःचा बंगलो असावा असे अनेक नागरिकांचे स्वप्न असते. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे प्रयत्न कामी आले. क्लिअर टायटल प्लॉटमुळे परवानग्या घेण्यासाठी नागरिकांची होणारी फरफट टळते. आमच्या प्रोजेक्टमध्ये रस्ते, पथदिवे, सांडपाणी व्यवस्थापन नलिका, पावसाळी पाणी वाहून नेणारी नलिका, उद्यान, क्रीडा मैदान आदी सुविधांसह सुंदर ले आउट केलेले प्लॉट्स विक्रील आहेत. नागरिकांना लाँग लाइफ सोईसुविधांसह आलिशान बंगलो बांधण्यासाठी अपेक्षित जागा मिळते.
- अतुल शिंदे, डायरेक्टर, साई अंगण
---
लग्झरिअस आणि प्रीमियम प्रॉपर्टी खरेदी करण्यास विशेषतः आयटीयन्स पसंती देतात. हिंजवडी आयटी पार्कपासून अगदीच दहा मिनिटांच्या अंतरावर ताथवडे येथे आम्ही घरे तयार करून देतोय. मुंबई-बंगळूर बायपासच्या कनेक्टिव्हिटीमुळे या भागातील रहिवाशांना काही मिनिटांत शहराच्या कोणत्याही भागात जाणे शक्य होते. या भागातील दर्जेदार संस्थांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कारक्षम पिढी घडविण्यास फायदा होतो. कॉस्मोपॉलिटन शहराच्या या भागात उच्चशिक्षित वर्गासोबत उत्कृष्ट समाज घडण्यास मदत होत आहे. ताथवडे भागात घर घेऊन राहण्याचे अनेक फायदे आहेत.
- विराज गावडे, डायरेक्टर, गारवे प्रॉपर्टीज
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.