पिंपरी, ता. २१ : निगडी प्राधिकरणातील तीन कंत्राटी कामगारांच्या मृत्युप्रकरणी अखेर पाच दिवसांनी ठेकेदाराला अटक करण्यात आली. ‘बीएसएनएल’ कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रमेश पाटील (वय ४६, रा. चिंचवडगाव) असे ठेकेदाराचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पाटील हा ‘बीएसएनएल’चा दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादार (टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर) आहे.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी फिर्याद दिली. गेल्या शुक्रवारी (ता. १५) निगडी प्राधिकरणात पाटील याला ‘बीएसएनएल’ कंपनीच्या ‘डक्ट’मधून नवीन ओ.एल.टी.ई. हे दूरसंचार उपकरण बसवण्यासाठी काम करून घ्यायचे होते. त्याने कंत्राटी कामगारांना मास्क, हँडग्लोव्हज, गमबूट आणि श्वसनास त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती सुरक्षा साधने पुरवणे गरजेचे होते. याची कल्पना असूनही त्याने ही साधने न पुरवता तसेच या कामासाठी तांत्रिकदृष्ट्या कुशल नसलेल्या दत्तात्रय विजयकुमार व्हनाळे, लखन ऊर्फ संदीप आशरुबा धावरे आणि साहेबराव संभाजी गिरशेट या तीन कामगारांना पाठवले. ‘डक्ट’मध्ये उतरल्यानंतर कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखेरीस त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.