पिंपरी-चिंचवड

‘इनहाऊस’ कोट्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ

CD

पिंपरी, ता. २५ : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात वारंवार केल्या जाणारा बदलांमुळे विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे. दरम्यान, १२ ते १४ जूनदरम्यान व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता २६ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांनाही माहिती देण्यात महाविद्यालयांना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. व्यवस्थापन कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास त्या सामान्य कोट्यासाठी संस्थांना जमा कराव्या लागणार आहेत.

यंदा दहावीच्या परीक्षा आणि निकालही लवकर जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. अकरावी नोंदणी प्रक्रियाही लवकर करण्यात आली. मात्र, राज्यभरात यंदा ऑनलाइन करण्यात आलेल्या प्रवेशामुळे वेळोवेळी वेळापत्रकात बदल केले जात आहेत. याचा त्रास विद्यार्थी, पालक व कनिष्ठ महाविद्यालयांनाही सहन करावा लागतो आहे.
नोंदणी प्रक्रियेत शहरातील १८ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज नोंदणी करता आली नाही. त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीनंतर आता नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. परंतु, नोंदणी प्रक्रियेला २५ दिवस पूर्ण झाले तरीही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. ८ जून रोजी व्यवस्थापन कोटा खुला करत ११ जूनपर्यंत या ५ टक्के जागांवर प्रवेश होतील, असे जाहीर करण्यात आले. यातही विलंब झाला असून या कोट्यातील प्रवेश ते १४ तारखेला पूर्ण झाले आहेत.

पहिली गुणवत्ता यादी आज
प्रवेश यादी होणार जाहीर मूळ वेळापत्रकानुसार दुसरी गुणवत्ता यादी २० जून रोजी जाहीर होणार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि अर्ज प्रक्रियेतील अपूर्णता लक्षात घेता पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यंदा जिल्ह्यातून २७ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी वाट पाहवी लागणार आहे.

प्रत्‍यक्षात पाच टक्के जागा
अकरावी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांना १० टक्के जागा दिल्‍या जात होत्या, पण प्रत्‍यक्षात ५ टक्के जागा महाविद्यालयांना देण्‍यात आल्‍या. त्यामुळे व्यवस्थापन (इनहाऊस)कोट्यातून प्रवेश घेण्‍यासाठी चढाओढ वाढली होती. अनेक विद्यार्थी प्रवेशाला मुकले आहेत.

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करून दीड महिना झाला. आतापर्यंत दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या असतात. परंतु, अद्याप फेऱ्या झाल्या नाहीत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. एकुणच संभ्रवस्था निर्माण झाली आहे.
- विक्रम काळे, प्राचार्य, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT