पिंपरी-चिंचवड

निगडीच्या अंकुश चौकात सिग्नलअभावी वाहतूक कोंडी

CD

पिंपरी, ता. २० ः निगडी येथील अंकुश चौकातील सिग्नल गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक विस्कळित झाली आहे. पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून अंकुश चौक ओलांडावा लागतो. पोलिस आणि महापालिका प्रशासनाने हा सिग्नल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
निगडी येथील अंकुश चौक हा सर्वाधिक वर्दळीचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा चौक. रुपीनगर, यमुना नगर, त्रिवेणीनगर, तळवडे या भागांतील सर्व वाहतूक इथेच एकवटते. मात्र, सिग्नल बंद असल्याने चारही बाजूंनी वाहने एकाच वेळी चौकात येतात. सकाळ, सायंकाळी भीषण कोंडी होते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी हा चौक जीवघेणा ठरत आहे. अंकुश चौकातील सिग्नल बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप स्‍थानिकांनी केले आहेत.

अंकुश चौक धोकादायक बनला आहे. सिग्नल बंद असल्याने वाहने अनियंत्रितपणे येतात. वारंवार तक्रारी करूनही काहीच होत नाही. एखादा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का?
- अमर मतकर, प्राधिकरण

सिग्नल सुरू करण्यास किती दिवस लागतात? अपघात होण्यापूर्वी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांना धोक्यात टाकणे थांबवा आणि तातडीने सिग्नल सुरू करा.
- राजेश जाधव, रुपीनगर

या आहेत मागण्या
- सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करावी
- वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक
- झेब्रा क्रॉसिंग, डिव्हायडर व मार्किंगचे नूतनीकरण
- चौकाचा सर्वांगीण वाहतूक आराखडा तयार करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT