पिंपरी, ता. २२ : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) स्टेडियमवर रविवारी (ता. २३) एका संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने गहुंजे परिसरासह कार्यक्रमस्थळी येणाऱ्या वाहतूक मार्गात रविवारी दुपारी दोन ते रात्री बारा या वेळेसाठी बदल केले आहेत.
मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना स्टेडियम व पार्किंगकडे जाण्यासाठी मार्ग
- किवळे पूल-मुकाई चौक यू-टर्न- कृष्ण चौक येथून सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या बाजूकडील सेवा रस्ता
- देहूरोड शितळादेवी मंदिर- लेखा फार्म सेवा रस्ता
- देहूरोड सेंट्रल चौक- किवळे पुलाखालून- मामुर्डी अंडरपासच्या डाव्या बाजूने कुणाल आयकॉन चौक रस्ता
- द्रुतगती मार्गाच्या देहूरोड एक्झिटमधून डावीकडे वळून मामुर्डीगावचा सेवा रस्ता
- देहूरोड सेंट्रल चौक येथून यु-टर्न घेऊन साईनगर फाटा
- शितळादेवी मंदिरमार्गे मामुर्डी गावात वाहन प्रवेशास मनाई
पुण्याकडून येणाऱ्या वाहनांना स्टेडियमकडे जाण्यासाठी मार्ग
- पुणे-बंगळूरु महामार्ग- किवळे पूल- सेवा रस्ता
- निगडी-रावेत-मुकाई चौक-कृष्णा चौक-सेवा रस्ता
- गहुंजे पूल-वाय-जंक्शन मार्गे केवळ कार पासधारक आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना प्रवेश
प्रवेश बंद
- मामुर्डीगाव ते मासुळकर फार्म मार्गावर वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने मामुर्डी जकातनाका मार्गे जातील.
- किवळेतील मरीमाता चौक ते मासुळकर फार्म मार्गावर प्रवेश बंद असून ही वाहने कृष्णा चौक मार्गे जातील.
- कार्यक्रम संपल्यानंतर मुकाई चौक बसथांबाकडून किवळे अंडरपास मार्गे मुंबई तसेच किवळे बाजूकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने मुकाई चौक येथून डावीकडे वळून समीर लॉन्स-किवळे गाव मार्गे जातील.
---------
मोशी परिसरातील वाहतूक मार्गात आज बदल
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत मोशीतील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे रविवारी (ता. २३) ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२५’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सायकलपटू सहभागी होण्याची शक्यता आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रविवारी या परिसरातील काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल पहाटे चार ते दुपारी बारा या वेळेसाठी असेल.
असा असेल बदल
- पुणे नाशिक महामार्गावरील बोऱ्हाडेवाडी चौक-गोल्ड जिम चौक-क्रांती चौक- स्पाईन रोड या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद राहणार असून ही वाहने स्पाईन रोड सेवा रस्त्याने जातील.
- स्पाईन रोड येथील सरदार चौक ते मातेरे हाऊस चौक मार्गावर वाहनांना प्रवेश बंद राहणार असून ही वाहने स्पाईन रोड सेवा रस्त्याने जातील
- आरटीओ कार्यालय रोड- दत्त मंदिर चौक ते सरदार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार असून ही वाहने स्पाईन रोड सेवा रस्त्याने जातील.
---