‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील उद्वाहक नादुरूस्त
‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील उद्वाहक मागील आठवड्यापासून बंद आहे, त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढता येत नसल्याने माघारी जावे लागत आहे. त्यामुळे येथील उद्वाहक तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी क्षेत्रीय कार्यालय अधिकारी अश्विनी गायकवाड यांना करण्यात येत आहे.
- एक वाचक, नवी सांगवी
NE25V70125
मुकाई चौक परिसरातील पथदिवे बंद
सेक्टर ३२ येथील धर्मराज चौक ते मुकाई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ज्ञानशांती शाळेपासून ते चितळे स्वीट मार्ट रस्त्यावरील स्मार्ट सिटी अंतर्गत लावलेले पथदिवे तसेच नवीन शोभेचे दिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. कृपया महापालिकेच्या विद्युत विभागाने आवश्यक ती कारवाई करून या दिव्यांची दुरुस्ती करावी.
-विलास खरे, मुकाई चौक
E25V70126
उद्यानातील खेळणी दुरुस्त करावी
यमुनानगर येथील ठाकरे मैदानातील लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य तुटल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानातील खेळणी तत्काळ दुरुस्त करावी.
- बाबा परब, यमुनानगर
PNE25V70124
नागरिकांच्या सोयीसाठी सूचना फलक आवश्यक
तळेगाव स्टेशन ते वराळे या रस्त्याचे खोदकाम चालु आहे, परंतु या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाही. रात्रीच्या वेळी येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करावी.
-एक नागरिक, तळेगाव दाभाडे.
PNE25V70127