पिंपरी-चिंचवड

चिखली, तळवडेच्या मतदार यादीतील नावे गायब

CD

चिखली, ता. २२ : चिखली, तळवडे, संभाजीनगर, पूर्णा नगर इत्यादी प्रभागातील मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने मतदारांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
चिखली प्रभाग क्रमांक एकमधील सुमारे साडेचार हजार मतदारांची नावे दुसऱ्याच म्हणजे प्रभाग क्रमांक ११ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तर तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील सुमारे १२०० मतदारांची नावे चिखली प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याचे मतदार याद्या तपासताना उघड झाली आहे. मतदारांची नावेच इतरत्र गेल्याने मतदारांबरोबरच इच्छुकांनीही मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. त्यासाठी अनेकजण हरकती घेत आहेत. विशेष म्हणजे अनेक इच्छुकांचीच नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. विधानसभेनुसार मतदार याद्या तयार केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सांगत आहेत. मात्र, अनेक मतदार ८० ते ९० वर्षाचे आहेत. त्यांना चालणे शक्य नाही, अशा परिस्थितीत या मतदारांनी स्वतः हरकतीचा अर्ज घेऊन जाणे कसे शक्य आहे, असा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीतील नावे गायब होणे, या प्रभागातील नावे दुसऱ्या प्रवास जाणे, अशा प्रकारामुळे मतदारांबरोबरच इच्छुकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

‘‘आम्ही मोरे वस्ती चिखली येथील रहिवासी आहोत. अनेक पिढ्यांपासून आमचे मतदान चिखली मोरेवस्ती परिसरातच आहे. मात्र, यावेळेस आमच्या घरातील ६५ मतदारांचे मतदान प्रभाग क्रमांक एकाऐवजी प्रभाग क्रमांक ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
- निखिल मोरे, नागरिक, मोरे वस्ती-चिखली

असा प्रकार घडला असेल तर वैयक्तिकरीत्या त्वरित हरकत घ्यावी त्याची लगेच सुनावणी घेण्यात येईल. मात्र, गेल्या विधानसभेत झालेल्या निवडणुकीनुसार तशाच प्रकारची नावे राहतील. काही मतदार पूर्वी दुसरीकडे राहिला होते आणि आता ते दुसऱ्या ठिकाणी राहिला आले आहेत. त्या प्रभागात हवे असेल तर ते आता लगेच शक्य नाही. ते पूर्वी आहे त्याच ठिकाणी राहील.
- अतुल पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, फ प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT