पिंपरी, ता. २२ : वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या एका लॉजवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला. आळंदी फाटा येथील सप्तगिरी लॉजवरील या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी लॉज चालक गजानन सटवाजी आव्हाड (रा. आळंदी, मूळ रा. परभणी) याला अटक करून चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मागील आठवड्यात हिंजवडी व रावेत येथेही अशी कारवाई करण्यात आली. हिंजवडी परिसरातील सनराईज वेलनेस आयुर्वेदिक स्पा येथील छाप्यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. रावेत येथील निसर्गम आयुर्वेदिक स्पावरील छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली.
-----