सामाजिक कार्याचा पाया म्हणजे लोकांच्या मनातील गरजा ओळखून त्यांच्या दिशेने सातत्याने आणि निःस्वार्थीपणे काम करणे. हाच गुण राम वाकडकर यांच्या कार्यशैलीतून ठळकपणे जाणवतो. साधेपणा, पारदर्शकता, कामातील तळमळ आणि सर्वसमावेशक विचार यामुळे ते आज आपल्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
- राम वाकडकर
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची धास्ती वाढत असताना वाकड-ताथवडे-पुनावळे प्रभाग क्रमांक २५ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून रामभाऊ वाकडकर यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. वाकड गावाचे पारंपरिक पाटील कुटुंबातील वारसदार असलेले रामभाऊ हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर सामाजिक विकासाचे मजबूत स्तंभ आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी वाकड परिसराला आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरणीय संवर्धनाच्या माध्यमातून नवे रूप दिले आहे. आता महापालिका निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादावर त्यांच्या या कार्याला नगरसेवक पदाने पूर्णत्व लाभणार असल्याची चर्चा आहे.
पारंपरिक वारसा आणि राजकीय प्रवेश
वाकड गावाच्या मातीशी नाळ जोडलेले रामभाऊ वाकडकर हे भाजपचे शहर उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. २०१० पासून पक्षात सक्रिय असलेल्या रामभाऊ यांनी सुरुवातीला वाकडमधील स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. पक्षांतर्गत गटबाजी आणि एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. २०२४ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पक्षांतर्गत कलहादरम्यान त्यांनी शहर उपाध्यक्षपदाचा राजीनामा देऊनही पक्षाच्या हिताची काळजी घेतली. हे त्यांच्या निष्ठेचे उदाहरण आहे. सध्या ते वाकड-काळाखडक-म्हातोबानगर-ताथवडे-पुनावळे प्रभागातून महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा पाया मजबूत आहे.
सामाजिक कार्य : तरुणांना चालना, महिलांना सन्मान
रामभाऊ यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या राजकीय ओळखीपेक्षा वेगळे आणि प्रेरणादायी आहे. वाकडमधील युवकांसाठी त्यांनी ‘मॅच डे अरेना’ आणि ‘द रिंग’ असे क्रीडा संकुल उभारले. जिथे पिंपरी-चिंचवडमधील मुलांच्या आणि तरुणांची प्रतिभा चमकू शकते. या संकुलांमधून फुटबॉल, बॉक्सिंग आणि इतर खेळांना प्रोत्साहन मिळाले असून, गेल्या वर्षी पाचशेहून अधिक युवकांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. ‘खेळ हे तरुणांची ऊर्जा आहे, ती समाजाच्या विकासात वळवायची असते,’ असे रामभाऊ सांगतात.
महिला सक्षमीकरणातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. वाकड परिसरातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता गटांना (SHG) त्यांनी आर्थिक साहाय्य आणि प्रशिक्षण दिले. २०२३ मध्ये त्यांच्या माध्यमातून दोनशे महिलांना उद्योग प्रशिक्षण आणि बँक लोनची सुविधा मिळाली. तसेच, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत दहा हजारांहून अधिक स्थानिकांना मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ दिला. पर्यावरण संवर्धनातही ते आघाडीवर आहेत. परिसरातील नाल्यांच्या काठावर वृक्षारोपण मोहिमेद्वारे पाच हजार वृक्ष लावले गेले, ज्यामुळे पर्यावरण संवर्धन झाले.
राजकीय योगदान :
पक्ष विस्तार व स्थानिक विकास
राजकीयदृष्ट्या रामभाऊ यांनी वाकडमधील भाजपचा पाया भक्कम केला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नाने वाकड प्रभागातून तयार झालेल्या तुल्यबळ पॅनेलने कडवी झुंज दिली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पक्षाची गळती रोखण्यासाठी त्यांनी अनेकदा मध्यस्थी केली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप यांच्या उमेदवारीला पाठिंब्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र आणले. स्थानिक पातळीवर रस्ते, पाणीपुरवठा व वाहतूक सुधारणा यासारख्या मुद्द्यांवर ते नेहमीच प्रशासनाकडे आग्रही राहतात. ‘राजकारण हे समाज सेवा करण्याचे माध्यम आहे. उत्पन्नाचे साधन नाही,’ ही त्यांची भूमिका कार्यकर्त्यांना प्रेरित करते. वाकडमधील रिक्षाचालकांसाठी त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. २०२४ मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ यांनी ११९ रिक्षाचालकांना मोफत गणवेश वाटप केले. ज्यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी झाला व सामाजिक प्रतिमा सुधारली.
निवडणुकीची वाटचाल
आव्हाने आणि आशा
महापालिका निवडणुकीत वाकड प्रभागातून इच्छुक असलेल्या रामभाऊ यांना पक्षांतर्गत देखील प्रचंड पाठिंबा मिळत असून, त्यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये त्यांचा विश्वास आहे. ‘वाकडची माती माझ्या रक्तात आहे, मी तिच्यासाठी जगतो,’ असे ते म्हणतात. आगामी काळात त्यांच्या या प्रयत्नांना निःस्वार्थ समाजसेवेला निवडणूक रिंगणात यश मिळवून देण्याचे काम जनता करेल, यात शंका नाही. पण एक गोष्ट निश्चित-रामभाऊ वाकडकर हे वाकड-ताथवडे-पुनावळेच्या विकासाचे खरे सेनानी आहेत.
व्हीजन : प्रभाग क्रमांक २५ : वाकड-ताथवडे-पुनावळे
मी राम हनुमंत वाकडकर, तुमचाच एक स्थानिक कार्यकर्ता, गेली अनेक वर्षे तुमच्या समस्या ऐकल्या, त्यासाठी लढलो. आता पूर्णवेळ नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाला ‘पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात सुंदर, स्वच्छ व स्मार्ट प्रभाग’ बनविण्यासाठी मी ठामपणे उभा आहे.
माझे दहा ठोस वचने
- पाणी समस्या कायमची संपविणार, प्रत्येक सोसायटीला २४×७ महापालिकेचे पाणी देणार
- बोअरवेल-टँकर माफियांचा पूर्ण बंदोबस्त करणार
- प्रभागातील शंभर टक्के रस्ते सिमेंट काँक्रिटचे, खड्डे रहित. डांगे चौक-हिंजवडी रोड, ताथवडे पथ, पुनावळे मुख्य रस्ता रुंदीकरण आणि सुशोभीकरण.
- कंपोस्ट पिट व प्लास्टिक रिसायकल युनिट
- उद्यान व खेळण्याची मैदाने प्रत्येक उपप्रभागात किमान दोन मोठी उद्याने आणि जीम तसेच बालोद्यानही करणार
- नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, मोफत मासिक आरोग्य शिबिरे
- प्रत्येक शाळेत स्मार्ट क्लासरूम आणि संगणक लॅब
- बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मोफत कौशल्य विकास केंद्र
- महिला समीकरणात प्रत्येक वॉर्डात ‘स्त्री शक्ती केंद्र’- स्वयंरोजगार प्रशिक्षण
- रात्री दहानंतर महिलांना सुरक्षित प्रवासासाठी ‘पिंक ऑटो’ सेवा
- मुख्य रस्ते व गल्ल्या पाचशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार, पोलिस गस्त वाढविण्यासाठी प्रयत्न, गुन्हेगारीला आळा घालणार
- महत्त्वाच्या चौकात मल्टी-लेव्हल पार्किंग, सिग्नल सिंक्रोनायझेशनने वाहतूक कोंडी संपविणार
- माझा वैयक्तिक व्हॉटसॲप ग्रुप आणि दर रविवारी प्रभागात जनता दरबार घेणार