पिंपरी-चिंचवड

क्रीडा विभागातील महिला अधिकाऱ्यावर मनमानीचा आरोप

CD

पिंपरी, ता. २४ : महापालिका क्रीडा विभागातील प्रशासन अधिकारी महिलेवर सहकारी कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभारचा आरोप केला आहे. या कर्मचाऱ्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून सदर अधिकारी महिलेचे वर्तन आणि कामकाजातील अडथळ्यांबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. आमदार अमित गोरखे यांनीही आयुक्तांना या प्रकाराबाबत पत्र दिले आहे.

उमा दरवेश-पुलगम असे या अधिकारी महिलेचे नाव आहे. कर्मचाऱ्यांशी उद्घट वागणे, जाणीवपूर्वक उशिराने स्वाक्षरी करणे, धमकीवजा उत्तरे देणे, कर्मचाऱ्यांचा अपमान करणे असे त्यांचे वर्तन असल्याचा आरोप त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच प्रशासन अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांचा पगार एक ऐवजी सात नोव्हेंबर रोजी झाला. यामुळे कर्मचाऱ्यांचे बँकेचे व इतर हप्ते उशिरा गेल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांचा आपत्तीकालीन भत्त्याचे बिल बनवूनही त्या स्वाक्षरी करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ चा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळू शकलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार गोरखे यांनीही दिलेल्या पत्रात कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा उल्लेख केला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी महिलेची अन्यत्र बदली करण्याची मागणीही गोरखे यांनी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या पत्रावर जवळपास शंभर कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली आहे.
दरम्यान, याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी माझ्याकडे किंवा सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठांकडे मांडाव्यात. याबाबत सविस्तर चर्चा करूनअडचणी सोडविल्या जातील. त्यांच्या तक्रारींवरही योग्य तो तोडगा काढला जाईल.
- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT