पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

टेम्पोची कारला धडक, कार चालकास मारहाण
जाधववाडी येथे टेम्पो चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कारला पाठीमागून धडक देऊन कार चालकास मारहाण केली. सतीश काळूराम शिंदे (४७, चिंचवड) यांनी या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वामी हनुमंत देवकर (२६), हनुमंत विठ्ठल देवकर (५०, चिखली) आणि रामचंद्र ऊर्फ सुनील शंकर गव्हाळे (२५, मोईगाव, खेड) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ होऊन वाहनाचे नुकसान झाले.  


कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वेगात जाणाऱ्या कारने एका दुचाकीस धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात देहू-आळंदी रस्ता, चिखली येथे घडला.
फुलचंद शिवाजी वाघ (३८, चिखली) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कारचालक महिला स्वप्ना तेजस टिके (३४, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोघांना अटक करण्यात आली. या दोन कारवायांत एका अल्पवयीन मुलासह एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट तीनने चाकण मार्केट यार्ड परिसरात कारवाई करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीची पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट चारने कुरकुंडी सेलू गाव रस्त्यावर कारवाई केली. मयूर बाळू वाघमारे (२३, कुरकुंडी, खेड) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले.

गांजा विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. तिच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ओटास्कीम निगडी येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने विक्री करिता गांजा बाळगला, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिच्या घरावर छापा मारून कारवाई केली. यामध्ये ५०४ ग्रॅम वजनाचा २५ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT