पिंपरी-चिंचवड

द्रूतगती मार्गावरील ओझर्डेजवळ खासगी प्रवासी बस जळून खाक

CD

तळेगाव दाभाडे, ता. २५ ः पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे नजीक खासगी प्रवासी बस मंगळवारी पहाटे अपघातग्रस्त झाली. त्यामुळे आग लागून बस जळून खाक झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे सुमारे ३० प्रवाशांचे जीव वाचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डेनजीक किलोमीटर क्रमांक ७८ जवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून पुणे मार्गे मुंबईकडे ही खासगी प्रवासी बसचे (एनएल ०१ बी २९५३) चालली होती. त्याचवेळेस चालक वर्षिकेत प्रल्हाद बिराजदार यांचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्यालगत धडकून बसने पेट घेतला. ही घटना समजताच महामार्ग पोलिसांचे पथक, देवदूत यंत्रणा व आयआरबी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तातडीने बचाव कार्य राबविले. पोलिसांनी तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधल्याने वडगाव, तळेगाव व रस्ते विकास महामंडळाच्या प्रत्येकी एकेक अग्निशामक पथकाने घटनास्थळी जाऊन तातडीने आग शमवली. या घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याने वाहतूक कोंडी टळली.
TDB25B02430

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अपघात; गरम वाफेच्या झळीत चार कर्मचारी भाजले

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT