पिंपरी, ता.२५ : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या फेरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे ३४९ प्रवेश निश्चित झाले.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांना ‘आरटीई’ अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर विनामूल्य प्रवेश देण्यात येतो. या प्रवेशित मुलांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेसाठी शहरातील १७० शाळांमधील ३ हजार ४३५ जागांसाठी १० हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. २ हजार १०१ प्रवेश निश्चित झाले होते. १ हजार १९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेशाला १८ मार्चपासून सुरूवात झाली होती. ती मुदत सोमवारी (ता.२४) पर्यंत संपली. परंतु मुदतवाढ दिल्यामुळे आता २५ मार्च ते १ एप्रिलपर्यंत प्रवेश होतील. अद्याप शहरातील ६९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश शिल्लक आहेत. त्यांचे प्रवेश दुसऱ्या टप्प्यात होतील.
आकडे बोलतात...
(प्रतीक्षा यादी क्रमांक एक प्रवेश)
उन्नत केंद्र / शाळा / एकूण जागा / प्रवेश / शिल्लक
पिंपरी - ६२ - ३७७ - १२४ - २५३
आकुर्डी - १०८ - ६६९ - २२५ - ४४४
एकूण - १७० - १०४६ - ३४९ - ६९७
राज्य शासनाकडून प्रवेश प्रक्रिया उशीरा चालते. मात्र प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश लवकर होणे आवश्यक आहेत. शाळा काही कारणास्तव एखाद्या विद्यार्थ्याच्या शाळा प्रवेश प्रक्रियेला अडथळा निर्माण करत असेल; तर त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेची आहे. कायद्याने कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू शकत नाही. ’’
- हेमंत मोरे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ
‘‘सध्या आरटीई प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश सुरू आहेत. या मुदतीमुळे अनेक पालकांच्या मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. काही पालकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे काही प्रवेश शिल्लक आहेत.’’
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.