नफ्याच्या आमिषाने २३ लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची २३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पीडित व्यक्तीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित यादव, कुंदन मिश्रा आणि इतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून २३ लाख ७० हजार रुपये घेतले. मात्र, कालांतराने कोणताही परतावा दिला नाही.
-------
टँकरच्या धडकेत महिला गंभीर जखमी
पिंपरी : टँकरच्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना आंबेठाण चौक, चाकण येथे घडली.
अलका गोपाळे (रा. बालाजीनगर, चाकण) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दत्तात्रय यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी दत्तात्रय आणि अलका हे दुचाकीवरून जात होते. दरम्यान, पाण्याच्या टँकरने दत्तात्रय यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरून दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान, टँकरचे चाक अलका यांच्या हातावरून गेले. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला.
---------
मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना आळंदी येथे घडली. रामेश्वर बाबुराव इंगळे (रा. चऱ्होली खुर्द) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रामेश्वर यांचे भाऊ शिवाजी यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. रामेश्वर हे दुचाकीवरून जात होते. चऱ्होली बायपास येथे आरोपीच्या मोटारीने रामेश्वर यांच्या दुचाकीला धडक दिली. यात रामेश्वर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटार चालक पसार झाला.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.